सय्यद शाहबाजने पटकावले स्वारातीम विद्यापीठाचे सुवर्ण पदक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 29 सितंबर 2018

सय्यद शाहबाजने पटकावले स्वारातीम विद्यापीठाचे सुवर्ण पदक.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२९सप्टेंबर २०१८
येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सय्यद शाहबाज याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत ऊंच ऊडी या क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावले. दि.२७व २८सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात विद्यापीठस्तरावरील मैदानी स्पर्धा पार पडल्या. यात महाविद्यालयाच्या सय्यद शाहबाज या विद्यार्थ्याने नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यातून आलेल्या दिग्गज खेळाडूंचा पराभव करून १.६२ मीटर ऊंच ऊडी मारत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. यासाठी त्याला क्रीडा संचालक गोविंद वाकणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशा निमित्त महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते आज सय्यद शाहबाज व प्रा.गोविंद वाकणकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते, गणेश पाटील, डाॅ.संतोष रणखांब, डाॅ.कल्याण गोलेकर, डाॅ.अशोक जाधव आदींसह सर्व प्राध्यापक ऊपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें