सेलूत ऑनलाइन फार्मसी विरोधात बंद व निषेध मोर्चा (उपजिल्हाधिकारयांना निवेदन ). - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 28 सितंबर 2018

सेलूत ऑनलाइन फार्मसी विरोधात बंद व निषेध मोर्चा (उपजिल्हाधिकारयांना निवेदन ).


प्रतिनिधी.सेलु.दि.28/09/2018.
(सेलू )केंद्र शासनाच्या ऑनलाइन फार्मसीला मंजुरी दिल्याच्या निषेधार्थ अखिलभारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या भारत बंद ला सेलूतील केमीस्ट अँण्ड ड्रगीस्ट असो. वतीने सेलूतील सर्व औषध विक्रेत्यांनी शुक्रवार दि. 28 रोजी कडकडीत बंद पाळून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढुन केंद्रसरकारच्या ऑनलाइन फार्मसी धोपणाचा तिव्र निषेध केला.
          येथील टिळक पुतळ्या जवळ सकाळी 10. 00 वा. शहरातील सर्व औषध विक्रेते काळ्याफिती लावुन जमा झाले होते.येथे टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध मोर्चा ला सुरवात झाली, हा मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतुन उपजिल्हाधिकारी कचेरीवर धडकला तेथे उपविभगीय अधिकारी मा. पारधी साहेबांना निवेदन देण्यात आले, निववेदनात म्हटले आहे की केंद्रसरकारने ऑनलाइन फार्मसीअधिसुचनेला मंजुरी दिल्यामुळे राज्यातील औषधविक्रेते,व्यावसायीक,कर्मचारी व त्यांच्याकुटुंबीयांवर एकप्रकारे अन्याय केला जातआहे. शासनाच्या या नव्या फार्मसी धोरणामुळे बेकायदा प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल, अत्यावश्यक सेवा खंडीत होवुन गर्भपाताची, गुंगीआणनारी व इतर अपायकारक औषधि सहज उपलब्ध होतील क्यामुळे सामाजीक स्वास्थ्य घोक़्यात येवुशकते याचा गांभिर्याने विचार करून संबंधित नवीन फार्मसी धोरण रद्द करावे अंन्यथा हा लढा अधिक तिव्र करण़्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष कैलास काळे, तालूका अध्यक्ष संदीप टाक, सचीव सुनिल डख, शिवनारायण मालाणी, समीर नाईकवाडे, रामेश्वर भुतडा आगींच्या स्वाक्षरया आहेत निषेध मोर्च्यात सेलूतील सर्व औषध विक्रेते सहभागीझाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें