गोकुळाष्टमी निमित्त बेटी बचाव बेटी पढाव संदेश देत आवतरले गोकुळ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

गोकुळाष्टमी निमित्त बेटी बचाव बेटी पढाव संदेश देत आवतरले गोकुळ.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३सप्टेंबर २०१८.
देशभरात आज गोकुळाष्टमीची धामधूम चालू असतानाच सोनपेठ येथेही वर्मा यांच्या निवासस्थानी बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश देत गोकुळ नगरी अवतीर्ण झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण देशभरामध्ये आज श्रीकृष्ण जन्म मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होत आहे. अनेक ठिकाणी या निमित्त दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सोनपेठ येथेही वर्मा यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' चा संदेश देणारी गोकुळ नगरी स्थापित केली आहे. वर्मा कुटुंबीय मागील अनेक वर्षापासून गोकुळाष्टमी निमित्त अशाप्रकारे देखावे तयार  करतात. देखावा पाहण्यासाठी शहरातील पुरुष तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. श्रीमती ताराबाई वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.चेतना, सौ.अनिता, कु.प्रतीक्षा, कु.प्रेरणा व कन्हैयालाल वर्मा यांच्या महिन्याभराच्या अथक प्रयत्नात हा मनोहारी देखावा निर्माण झाला आहे. आजची ही कलाकुसर पाहून आलेल्या मंडळीं आनंद व्यक्त करतांना दिसुन येत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें