स्वातंञ्य सेनानी हरिभाऊ चारठाणकरांनी संगीत जगवले - सुरमनी डॉ. कमलाकर परळीकर . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

स्वातंञ्य सेनानी हरिभाऊ चारठाणकरांनी संगीत जगवले - सुरमनी डॉ. कमलाकर परळीकर .



सेलू प्रतिनिधी

(सेलूत स्वरभास्करांच्या चरिञग्रंथाचे प्रकाशन)
(सेलू) स्वातंत्र्य सेनानी पं. कै. हरिभाऊ चारठाणकर संगीताचे एक अवलीया साधक होते,स्वातंञ्यपुर्व काळात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत
स्वातंत्र्य लढ्याबरोबरच संगीता सारख्या कलेचा जीवन जगण्यसाठी उपयोग न करता संगीतालाच जगवण्याचे महत्कार्य त्यांनी केले असे गौरोवोद्गार सुरमनी डॉ. कमलाकर परळीकर यांनी काढले.
 येथील स्वातंञ्य सेनानी स्वरभास्कर कै. पं. हरिभाऊ चारठाणकर यांच्या "दिलरूबा मधुर हा... " या चरीञग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.
             नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गील्डा सभागृहात दादांच्या नवव्या सृतीदिनानिमीत्य शनिवार दि. 01 सप्टे. रोजी संपन्न झालेल्या ग्रंथ प्रकाशन व संगीत समरोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणुन साहित्यीक विलासराव चारठाणकर ,वामनराव वाईकर, गोविंदभाऊ जोशी, अँड. एल. एम. सुभेदार, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिति होती.
चरित्र ग्रंथ प्रकाशनानंतर रंगलेल्या संगीत मैफीलीत यशवंत चारठाणकर,नरेंद्र चारठाणकर व हेमंत चारठाणकर यांनी संगीत सौभद्र या नाटकातील नांदी सौरभ संघानितसे व दिलरूबा मधुर हा हे नाट्यपद सादर केले, तर सुरमनी डॉ. कमलाकर परळीकर यांनी "तुमको प्रणाम कोटी कोटी " हे गीत विर जवान व स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित केले, त्यानंतर राग सादर करताना केलेली सुरेल आळवणी ,सरगमचा गजर, जोरदार ताना व ललकारी करत " क्या  अजनबी मिलेगा " सादर केलेली गझल व "भजे श्री हरि को सदा " या भैरवीने रसीक श्रोत्यंना मंञमुग्ध केले.प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ. गंगाधर गळगे,सौ.रमा बाहेती, सौरभ कान्हेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कै.नारायण ञिनगरे, कै. सुशिला मुळावेकर ,कै. गोविंदराव लिंबेकर, प्रतिभा चारठाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक सौ. सुरेखा चारठाणकर,सौ.वर्षा किरण जोशी यांनी स्वागतगीत,तर डॉ. प्रशांत जोशी, शिवाजीराव पाठक, गौरव कान्हेकर, शंतनु पाठक, शांतीभुषण चारठाणकर, विश्राम परळीकर यांनी संगीत साथ केली. सुञसंचालण प्रा. प्रकाश कुरूंदकर तर सौ. वैशाली चारठाणकर यांनी आभार मानले.तिन वर्षाच्या कु. शर्वरी सागर कुलकर्णी हीने सादर केलेल्या ' वंदे मातरम ' ने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगाधर कान्हेेकर,डॉ.भास्कर शिंदे, डॉ. प्रविण जोग, सौ. किर्ती राऊत, संतोष चारठाणकर यांनी परीश्रम  घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें