वाढदिवसा निमित्त शाळेस पुस्तकांची भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 3 सितंबर 2018

वाढदिवसा निमित्त शाळेस पुस्तकांची भेट.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३सप्टेंबर २०१८

तालुक्यातील जि.प.प्रा.शा.विटा(खु.) या शाळेत आज इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु.ऋतुजा मुंजा तुपसमिंद्रे हिचा वाढदिवस शाळेत साजरा करण्यात अाला.
या प्रसंगी तिने शालेय ग्रंथालयास पुस्तके शाळेचे मुख्याध्यापक शेख यांच्याकडे सुपूर्द केली.
सोनपेठ तालुका ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांच्या प्रेरणेतून शाळेत ग्रंथरूपी वाढदिवस साजरे होत आहेत. राजेश्वर खेडकर यांनी कु.ऋतूजा तुपसमिंद्रे हिस वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवसा निमित्त शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल अभिनंदन केले.
         शाळेच्या वतीने विद्यार्थी प्रतिनिधी इम्रान पठाण व विद्यार्थीनी प्रतिनिधी संघप्रिया तुपसमिंद्रे हिने तसेच पं. स.मा.उपसभापती मदनराव भोसले, मुख्याध्यापक शेख, सहशिक होसनाळे, बनाळे, व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण तुपसमिंद्रे, व सदस्य विटा(खु), ग्रामपंचायत सदस्य कारभारी तुपसमिंद्रे यांनीही तिला शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें