सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१५सप्टेंबर २०१८
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पि.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणुन महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने म्हणुन साजरी करण्यात येते. यानिमित्त सोनपेठ येथे मागील तीन वर्षापासून सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने वाचन प्रेरणादिन तालूकास्तरावर राबविला जातो. आजपर्यंत यामाध्यमातून चळवळीच्यावतीने लोकसहभागातून सोनपेठ तालूका व तालूक्या बाहेरील अनेक शाळांना पुस्तके पुरविण्यात आली आहेत. यामुळे आज अनेक शाळांनी त्यांचे अधिकृत ग्रंथालये स्थापन केली असुन; त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
यावर्षीही वाचन प्रेरणा दिनी तालूक्यातील शाळांना पुस्तके भेट देऊन खऱ्या अर्थाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचा चळवळीचा विचार आहे. याकरिता सोनपेठ शहर व तालूक्यातील ग्रंथप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था आदींनी ज्ञान दानाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊन, आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करण्यासाठी व त्यांच्या बौध्दीक विकासासाठी वाचून झालेली, घरात आडगळीला पडलेली पुस्तके चळवळीस भेट देऊन मदत करावी असे आवाहन सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी एका निवेदनाद्वारे नुकतेच केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें