सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१५सप्टेंबर २०१८
येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. संतोष रणखांब यांच्या विद्यार्थी, शिक्षक, संघर्ष, अनुभव व भावना या विषयावरील व्याख्यानाचे प्रसारण आकाशवाणी वरून प्रक्षेपित होणार आहे. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या विचारशलाका या कार्यक्रमात १९ ते २३ सप्टेंबर २०१८ दरम्यान सकाळी ६.०५ मिनीटाला हे प्रसारण होनार आहे.
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा.डॉ. रणखांब यांच्या या अभ्यासपुर्ण व्याख्यानाचा परिसरातील श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रसिद्धी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें