सिल्लोड मतदारसंघात राष्ट्रीय ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेस चालना;
सिल्लोड : प्रतिनिधी (दि.१५ ) -
सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील पाणी टंचाई प्रश्नावर मात करण्यासाठी आ.अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल टप्पा दोन मधील आराखड्यात सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अनुक्रमे १४ व ०५ कामे मंजूर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत टप्पा दोन मध्ये एकुण ४५ कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल टप्पा दोनचे मंजूर कामाचे सर्वेक्षण करुन अंदाजपञक तयार करण्यासाठी अधिका-यांमार्फत कार्यवाही सुरू असुन पाणी टंचाई प्रश्नावर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील नागरिकांना दिवसेंदिवस पाणी टंचाई समस्या खुपच सतावत आहे. अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत पण दुष्काळी परिस्थितीसह खेळणाधरणासह - पाझर तलावांमधील पाणी हिवाळयातच आटत आहे परिणामी नागरिकांना पाणी टंचाई समस्या खुपच भेडसावत आहे.अनेक गावांसाठी तर हिवाळ्यातच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो.दिवसेंदिवस पाणी टंचाई समस्या खुपच भेडसावत असुन पाणी टंचाई प्रश्नावर मात करण्यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करीत वाडी - वस्ती - तांड्यासह ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी आपल्या दुरदृष्टीच्या कल्पनेतून सिल्लोड शहरासाठी खेळणा मध्यम प्रकल्पामध्ये चर खोदून सिल्लोड शहरवासियांची तहान भागवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे तसेच आपल्या दुरदृष्टी विचारातून खडकपुर्णा धरणातून सिल्लोड शहरासाठी पाणी पुरवठा योजनेचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील वाडी - वस्ती - तांड्यासह गावा - गावातील नागरिकांच्या पाणी टंचाई प्रश्नावर मात करण्यासाठी माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या अहोरात्र प्रयत्नातून सिल्लोड मतदारसंघातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल टप्पा दोन मधील आराखड्यात सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अनुक्रमे १४ व ०५ गावांची कामें मंजूर करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत टप्पा दोन मध्ये ४५ गावांसाठी कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेल्या कामांचे तात्काळ सर्वेक्षण करुन अंदाजपत्रक तयार करण्यासाठी अधिका-यांना सांगण्यात आले असल्याची माहिती माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल टप्पा दोन मधील मंजूर असलेल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे - सिल्लोड तालुक्यातील - पानवडोद खु.,धोञा,नाटवी,जळकी - वसई,खुल्लोड,केळगाव,वडोदचाथा,बनकिन्होळा,
मुकपाट,रहिमाबाद,सावखेडा खु.,मांडणा,आमठाणा,दहिगाव, तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल टप्पा दोन मधील प्रस्तावित गावांची नावे - म्हसला बु., आसडी,पिंपळदरी,सराटी,बोदवड,पानस,उंडणगाव,
जळकीघाट,बोजगाव,शिवना,बाभुळगाव,वरखेडी भायगाव,दिडगाव,उपळी,दिग्रस,तळणी,चिंचपुर,
मंगरुळ,देऊळगाव बाजार, देऊळगाव वाडी,बोरगाव सारवणी,अंधारी,कोटनांद्रा,कोटनांद्रा वाडी,बाळापुर,अनाड,बोरगाव कासारी,गव्हाळी,तलवाडा,वरुड,पिंप्री,मादणी,लिहा - खेडी,पालोद,जंजाळा,लोणवाडी,तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील टप्पा दोन मधील मंजूर असलेल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे - सोयगाव तालुक्यातील फर्दापुर तांडा,वाडी सुतांडा,घाणेगाव,वरठाण,पळशी तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल टप्पा दोन मधील
प्रस्तावित गावांची नांवे या प्रमाणे आहेत
बनोटी), रावळा-जावळा, आमखेडा, वाकडी, लेणापुर, निमखेडी, गलवाडा, तिडका या गावांचा समावेश आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें