शिक्षकी पेशाचा अभिमान बाळगावा,कुलगुरू अशोक ढवण यांचे प्रतिपादन . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 सितंबर 2018

शिक्षकी पेशाचा अभिमान बाळगावा,कुलगुरू अशोक ढवण यांचे प्रतिपादन .



♦ शिक्षकदिनी जिल्हास्तरीय पुरस्काराने १४ शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा  सन्मान.


🔷 जिल्हा परीषद शिक्षण विभागाचा उपक्रम.


 सेलू प्रतिनिधी

सेलू  (समशेर पठाण )
                        शिक्षण क्षेत्राच्या पायाभरणीच्या जडणघडणीत  प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे ते टाळता येत नाही. शिक्षकांची प्रतिमा  उत्तम आहे शिक्षण क्षेत्रात  शिक्षकांना  आता समर्पित भावनेने काम करण्याची  गरज आहे .त्यामुळे शिक्षकांनी  शिक्षकी पेशाचा अभिमान बाळगावा असे प्रतिपादन  मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण यांनी केले
                     येथील अक्षदा मंगल कार्यालयात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर १८  रोजी दिवंगत राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन अर्थात शिक्षकदिनाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील  जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात विशेष अतिथी म्हणून अशोक ढवण बोलत होते.
          या समारंभाचे उद् घाटन  मुख्यकार्यकारी अधिकारी बि.पी. पृथ्वीराज यांचे शुभहस्ते झाले तर अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा सौ उज्वलाताई राठोड ह्या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण ,आरोग्य  सभापती सौ भावनाताई अनिलराव नखाते, बांधकाम सभापती अशोकराव काकडे  समाजकल्याण सभापती सौ .उर्मीलाताई मारोतराव  बनसोडे , विठ्ठलराव सुर्यवंशी, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक , शिक्षण समीती सदस्य बाबुराव नागेश्वर , सुषमाताई गोविंदराव देशमुख , शंकरराव वाघमारे ,विश्वनाथअप्पा  सोळंके , राधेश्याम वाढवे ,पूर्णा पं.स.सभापती अशोकराव बोखारे  गंगाखेड पं.स.सभापती मगर पोले ,जि प सदस्य  अंजलीताई देशमुख  ,राजेश फड , अभिनव राऊत,  गोविंदराव देशमुख ,कोंडीबा सोनटक्के, महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक डी.डी.भिसे यांची उपस्थीती .
                             यावेळी बोलताना कुलगुरु  अशोक ढवण म्हणाले की मराठी माध्यमाच्या शाळा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे इंग्रजी माध्यमाचा नवीन ट्रेनमुळे कोणीही हताश न होता मराठी माध्यमाच्या शाळा सक्षम करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
     या वेळी सामाजीक ,शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट काम करणार्या जिल्हापरीषद शाळेतील ९ प्राथमिक, ४  माध्यमिक व १  प्रोत्साहनपर अशा १४  शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल ,स्मृतिचिन्ह ,श्रीफळ ,साडी चोळी, एक झाड व एक आकर्षक  बॅग हि भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर  नवोदय प्रवेशासाठी निवड  झालेले ३७  विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवता यादिमधील ०३  विद्यार्थी दहावीच्या परीक्षेतील ४८  गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
                         प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र भावसार व प्रवीण वायकोस यांनी केले आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी केले.स्वागतगित कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह गंगाखेड येथील चिंचोलकर यांच्या संचाने सादर केले तर माधव घयाळ यांनी सुंदर रांगोळीचे रेखाटण केले. तसेच ईझी रिडींग या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी बि.पि.पृथ्वीराज ,शिक्षण सभापती भावनाताई नखाते ,सभापती अशोक काकडे ,राजेश फड बाबुराव नागेश्वर शंकरा वाघमारे यांनी मार्गदर्शन केले तर  पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर धिवार व मीरा सुरनर यांनी मनोगत व्यक्त केले.
 यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी, व सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

 *शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानावा.....बि.पी.पृथ्वीराज*
                  विद्यादान करतो हा आता उपकार वाटून घेण्याची शिक्षकांना  गरज नाही तर  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपली आहे असे विचार शिक्षकांच्या मनात रुजणे आवश्यक आहे .परंतू  जबाबदारीचे प्रमाण कमी झाल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. माझ्या सहा महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाबत कोणतेही शिक्षक मला भेटले नाही .याउलट वेतन बंद ,वेतनवाढ रोखली अशा स्वतःच्या मागण्याबाबत भरपूर निवेदन शिक्षकांची आले याबाबत  ची खंत मुख्य कार्यकारी अधिकारी बी पी प्रथ्वीराज यांनी व्यक्त केली .त्याचबरोबर लोकसहभागातून शाळेचा विकास करण्याची गरज निर्माण झाली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळा विकासाबाबत गांभीर्याने विचार करावा  असे मतही त्यांनी व्यक्त केले.

*जिल्हा परिषदेचे विद्यार्थी उच्च पदावर पाहण्याचे स्वप्न....भावनाताई नखाते*
             जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भौतीक  सुविधेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर बघण्याचे स्वप्न शिक्षण विभागाचे आहे .ग्रामीण भागातील १००शाळांना ई-लर्निंग तर ४००शाळांना सोलार सिस्टिम  उपलब्ध करून दिले जाणार आहेत .यासह सर्व भौतिक सुविधा देण्यासाठी शिक्षण विभाग तत्पर आहे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश दिले आहेत त्याचबरोबर क्रीडा गणवेश देण्याच्या मानसही उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती जिल्हा भावनाताई नखाते यांनी व्यक्त केला. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न न्यायालय प्रक्रियेत प्रलंबित असल्या तरी याबाबत लक्ष दिले जाईल त्याचबरोबर या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आकर्षक भेटवस्तू देण्याचा शिक्षण समितीच्या बैठकीत स्तुत्यनिर्णय घेण्यात आला असे प्रतिपादन  भावनाताई नखाते यांनी केले.

🛑या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान
     *प्राथमिक शिक्षक  संवर्गामधुन*
 शेख मुन्तजीब शेख बाबू (उर्दू प्रा.शा.उखळद ता.परभणी ) ,मस्के सिद्धार्थ विठ्ठलराव ( प्रा. शा.फुलकळस ता.पूर्णा  ) ,चव्हाण तुकाराम कनीराम ( प्रा.शा. पाचलेगाव ता.जिंतूर)  ,सुरनर मीरा  माधवराव ( प्रा.शा.बनपिंपळा ता. गंगाखेड),  पंडीत विजयकुमार आश्रोबा (प्रा शा काळेवाडी ता.पालम) , पवार दत्ता केशवराव (प्रा.शा.वाणीसंगम ता. सोनपेठ), डासाळकर वसंत अण्णासाहेब (प्रा.शा. माळसापुर ता.सेलू), भिसे  दिगंबर एकनाथराव ( प्रा.शा. उक्कलगाव ता. मानवत)  ,कावळे हरिदास कोंडीबा (प्रा.शा.नामदेव नगर पाथरी)
           *माध्यमिक शिक्षक संवर्गमधून*
उदय वसंतराव कुलकर्णी (जि.प. प्रशाला झरी ता.परभणी),किशोर बन्सी धिवार (जि.प. प्रशाला सोनपेठ ), क्षिरसागर श्रीकांत शिवाजी (जि.प. प्रशाला पेठ पिंपळगाव ता. पालम ),बुधवंत पंढरीनाथ मुगाची (जि प प्रशाला  भोगाव ता. जिंतूर )
                         *प्रोत्सहानपर शिक्षक संवर्गमधुन*
शिंदे बालाजी चुडाजी (के.प्रा.शा.पिंपळा लोखंडे ता.पुर्णा) .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें