उपसंपादक शेख अजहर
बदनापूर(प्रतिनीधी)
बदनापूर तालुक्यातील लोकप्रिय एकमेव वरिष्ठ कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उर्दू विभागा तर्फे उर्दू गझल या विषयावर एक दिवसीय सेमिनार घेण्यात आले.या सेमिनार मध्ये शासकीय महाविद्यालयाच्या उर्दू विभागातील प्रा.नुजहत परवीन हे प्रमुख पाहुणे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बदनापूर कॉलेज चे उपप्राचार्य डॉ.गणेश गावंडे होते व मोठ्या प्रमाणावर उर्दू विभागातील विद्यार्थी तसेच उर्दू विभागातील उर्दू प्रमुख डॉ.अतिख अहेमद,प्रा.अबरारुल हक इत्यादी होते.
या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करतांना प्रा.नुजहत परवीन यांनी सांगितले की उर्दू गझल चा इतिहास हा मराठवाड्यातील नामांकित शायर बशर नवाझ यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही .
बदनापूर तालुक्यातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या उर्दू विभागा तर्फे प्राचार्या डॉ.एम.डी. पाथरीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी निमित्त साधून सेमिनार,वर्कशॉप मुशयरा या सारख्या दरवर्षी वेगवेगळी कार्यक्रम घेण्यात येतात.
याचाच भाग म्हणून व मराठवाड्यातील नामांकित शायर यांच्या जन्म दिवसाच्या निमित्त साधून एक दिवसीय सेमिनाराचा आयोजन करण्यात आले होते. या सेमिनार मध्ये पंधरा विद्यार्थ्यानि उर्दू गझल व बशर नवाझ ची शायरी या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच प्रा.नुजहात परवीन यांनी पुढे सांगतांना सांगितले की बशर नवाझ हे मराठवाड्यातील महान व्यक्ती,लेखक व प्रसिद्ध शायर होऊन गेलेले आहे आणि आधुनिक उर्दू गझल मध्ये त्यांनी लौकिक प्राप्ती केलेली आहे अश्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला.
हा कार्यक्रम संस्थेच्या प्राचार्य व मॅनेजिंग डिरेक्टर डॉ.देवेश पाथरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची यशस्वी कामगिरी उर्दू विभागातील प्रा.अबरारुल हक यांनी पार पाडली तर आभार प्रदर्शन प्रा.अब्दुल रहेमान यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें