शिर्डी/ प्रतिनिधी ( राजेंद्र दुनबळे)
भारिप बहुजन महासंघाच्या राहता तालुका अध्यक्ष पदी विकास बोधक तर शिर्डी शहाराध्यक्षपदी उत्तम पाईक यांची निवड करण्यात आली
बहुजन महासंघाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष शरद खरात यांच्या हस्ते विकास बोधक व उत्तम पाईक यांना निवडपत्र देण्यात आले
सक्षम नेता नसल्यामुळे समाज भरकटत गेल्यामुळे याचा आजही राजकीय पुढारी वापर करुन घेत आहे आता आपल्यासाठी काम करुन गाव तीथे शाखा हि संकल्पना राबवुन भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाखा काढू असे विकास बोधक म्हणाले ,कार्यकर्ताची मोठी फौज करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अॅड बाबासाहेब आंबेडकर विराजमान करण्याचा ध्यास सर्व बहुजनानी घ्यावा असा संकल्प करुन जोमाने कामाला लागावे असे मत उत्तम पाईक यांनी वेक्त केले
आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी आवारे.राजेंद्र भालेराव.विनय कदम.पुष्पक कदम.सौ.उज्वला निकम.सतिष निकम.रविंद्र गायकवाड.भारत पवार.सतिष कदम.सागर कदम.अमोल कदम. गगन हाडा ,बाळू आवारे विकास पाईक ,बाबासाहेब बनसोडे.राहुल वाघमारे.संदिप म्हस्के.आशिष कदम.प्रशांत कदम.गौतम पगारे.आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें