गोळी लागुन घर कामगार गंभीर जखमी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 23 सितंबर 2018

गोळी लागुन घर कामगार गंभीर जखमी .



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२२सप्टेंबर २०१८

सोनपेठ शहरातील एका माजी पोलीस आधिकाऱ्याच्या घरात नौकरीवर असलेल्या तरुणास गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असुन जखमीस अधिक उपचारासाठी आंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनपेठ शहरात सर्वत्र गणेश विसर्जन व मिरवणुकीची तयारी धामधूम असतानाच घडलेल्या या घटनेची शहरात चर्चा होत असल्याचे दिसून आले.
शनिवार दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील विटा रोडवर राहाणारे माजी पोलीस उपाधिक्षक पवार यांच्या घरी काम करणाऱ्या सुनील विश्वनाथ मुंडे (२१ वर्षे) यास गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी सुनिल यास आंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळी कशी लागली? कोणी मारली? या बाबत काही माहिती मिळु शकली नाही. सोनपेठ पोलिसात या घटनेची अधिकृत नोंद झाली नसली तरी पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्याचे समजते. या बाबत पोलीसांनी आंबाजोगाई येथुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें