भोकरदन प्रतिनिधी : नुकत्याच जालना येथे झालेल्या जिल्हास्तरीय 14 वर्ष वयोगटातील आयोजीत व्हॉलीबॉल स्पर्धेत भोकरदन शहरातील जनविकास शिक्षण संस्था संचलित श्री गणपती इंग्लिश हायस्कूल चे संघ जालना जिल्ह्य़ात दुसर्या क्रमांकावर घेऊन उपविजेते ठरले.
या स्पर्धेत सहभागी शाळेतील मुलींचा संघ निकीता आहेर, पोर्णिमा चेंडोल, संध्या निकम, निशा माळी, पल्लवी बोरसे, शिवानी जाधव, मयुरी जाधव, स्वाती बावस्कर, मयुरी भोटकर, प्राची पाडळे, कोमल दांडगे आणि चित्रा पवार या मुलीच्या संघाने बाजी मारली तर मुलांचा संघ सागर सपकाळ,शुभम गायकवाड, अभिषेक गवळी, अजय सपकाळ, आनंद सपकाळ, रितेश सपकाळ, सागर बावस्कर, सुजीत शेवाळे, स्वामी देशपांडे, अमोल दांडगे, पवन सपकाळ आणि पवन इंगळे या दोन्ही संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत उपविजयते मिळवले आहे.
या दोन्ही विजेत्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष तथा मा.नगराधयक्ष राजाभाऊ देशमुख, न्यू हायस्कूल चे मुख्याध्यापक भालेराव ,पाटील सर, शाळेचे प्राचार्य बी.एम.तांबारे, सोपान सपकाळ, क्रीडा शिक्षक गौतम खाडे, मोहित जैस्वाल, रोशन देशमुख सासते व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें