किरन स्वामी यांची अध्यक्ष तर शोभा बिराजदार यांची उपाध्यक्षपदी निवड.
सोनपेठ(प्रतिनिधी) दि,२९सप्टेंबर २०१८
दि.२९ सप्टेंबर शनिवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ येथे नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम मुख्याध्यापक गायकवाड व देशमुख यांनी निवड प्रक्रिया संबंधित नियम व अटी उपस्थितीतांना समजावून सांगितले. या बैठकीत चर्चा होऊन पालकवर्गातुन बाबासाहेब कसबे, रंजना चोथवे, किरण स्वामी, अच्युत कदम, आसेफ मुलानी, अंजली कराळे, द्रौपदी मोटे, राजेभाऊ पवार, मीरा लाकडे, रामेश्वर कलिंदर, उषा दळवे व शोभा बिराजदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर नवनियुक्त सर्व बारा सभासदांनी मतदान करून किरण स्वामी यांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणुन निवड केली. अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात किरन स्वामी यांना ०७ तर अच्युत कदम यांना ०५ मते प्राप्त झाली. सौ.शोभा बिराजदार यांची सर्वसंमतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ही निवड आरक्षण नियमानुसार सर्व पालकांच्या उपस्थितीत लोकशाही पध्दतीने संपन्न झाली. समितीच्या निवडीनंतर शिवाजी कदम, रविकुमार स्वामी व मौलाना समियोद्दीन काजी यांनी मनोगत व्यक्त करून शाळे संबंधित अडीअडचणींंवर विचार मांडले.
या निवड प्रक्रियेवेळी पालकवर्ग, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड व सर्व वर्गाचे वर्ग शिक्षक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें