औरंगाबादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी दोन दिवसात पक्ष सोडण्याच्या तयारीत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 सितंबर 2018

औरंगाबादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी दोन दिवसात पक्ष सोडण्याच्या तयारीत.



औरंगाबाद(प्रतिनिधी)औरंगाबादेतील स्थानिक नेतृत्वाला कंटाळून व पक्षाची मुस्लिम समाजाच्या समस्येवर दुजाभावची भूमीकेला कंटाळून औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष पुर्व मतदार संघ शाकेर खान,शहर महासचिव उमर पटेल,शहर जिल्हा उपाध्यक्ष समीर मिर्झा,युवा उपाध्यक्ष अनवर नवाब व औरंगाबादेतील व मराठवाड्यातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत.
सदररील प्रतिनिधीने शाकेर खान यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्थानिक पातळीवरच्या गटबाजीवर खापर फोडतं भाऊला भाईचे कार्यकर्ते चालत नाहीत,भाईला भाऊचे कार्यकर्ते  चालत नाहीत,आणि या दोघांच्या मध्ये भैयाचे कार्यकर्ते कोणालाच जुमानत नाहीत.पक्षाची अत्यंत वाईट अवस्था सध्या शहरातून पहायला मिळत आहे.स्वर्गवासी मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या कार्यकाळात पक्षाची स्थिती अत्यंत चांगली होती.तेव्हा पक्षाचे चौदा नगरसेवक होते.आज पक्षाचे फक्त चार नगरसेवक आहेत.अशी परिस्थिती पक्षाची सध्या शहरात आहेत.तसेच पक्षात नवीन आलेल्या व्यक्तीला त्याची पाश्वभूमीची शहानिशा न करताच त्यांना लगेच शहर जिल्हा  उपाध्यक्ष पद दिले जाते.शहरात पक्ष आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.तेव्हा पक्ष वाढविण्यासाठी कोणतेच कार्य केले जात नाही.अशी प्रतिक्रिया शाकेर खान यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें