केदारखेडा : केदारखेडा स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल मध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्या्र्थ्यांनी शाळेची धुरा सांभाळत अध्यापनाचा अनुभव घेतला. विद्यार्थिच मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक झाले होते. यामध्ये मुख्याध्यापक म्हणुन भागवत गाडेकर या विद्या्र्थ्याने जबाबदारी स्विकारल्याबद्दल त्याचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गौरव हिवाळे, रुद्र ढवळे, हरिओम उगले, अजिंक्य शेळके, दीपक मोरे, शिवराज जुंबड, वैभव मोरे, भारत कुदर, तन्मय गायकवाड, शिवानी जाधव, योगिता बसैये, आरती कालभिले, मंजुषा काळे, अथर्व ढवळे, किंजल टेहरके, रविराज गाडेकर, अंजली जाधव, प्रांजल गव्हाणे यांचा उत्कृष्ठ अध्यापन केल्याबद्दल विद्या्र्थ्यांचा पारितोषीक देऊन सन्मान करण्यात आला.
विद्या्र्थ्यांनी उत्कृष्टरीत्या जाबाबदारी पार पाडल्या बद्दल संस्थेचे सचिव विलास काळे यांनी मुलांचे विशेष कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नितीन ठोंबरे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तृपी अग्रवाल यांनी केले तर दया पवार यांनी प्रास्तवीक केले. तर शाळेचे व्यवस्थापक गणेश सोळुंके यांनी विद्या्र्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुवर्णा सोळुंके, सरिता काळे, टी.एस.आडे यांच्यासह सविता जाधव, विलास ढवळे, विष्णू खिल्लारे, अकिल शेख, अंकुश सोलाट, ऋषिकेश काळे आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें