छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 सितंबर 2018

छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा.



भोकरदन प्रतिनिधी - भोकरदन तालुक्यातील तांदुळवाडी येथे दि 5.सप्टेंबर हा दिवस  श्री छञपती संभाजी मा व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुळवाडीमध्ये सर्वपल्ली डाॅ राधाकृष्ण यांची जयंती म्हणून  साजरा करण्यात आला, यावेळी शालेय विद्यार्थी नी स्वयं-शासन दिन हा  शिक्षक दिन म्हणून साजरा केला. यावेळी संपुर्ण दिवस विद्यार्थी यांनी शिक्षक बनून इतर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करून,शिक्षकांना शिकवतांना कशी कसरत करावी लागते यांचा अनुभव घेतला. यावेळी विद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक चिकटे हा मुख्याध्यापक झाला तर वैष्णवी गिरी,अश्विनी चिकटे,गणेश सावंत,आशिया शेख,नेहा वैष्णव,छाया सोनवणे,आरती आहेर,अजय आढावणे,कृष्णा रोडे,विशाल चिकटे यांनी उत्कृष्ट पणे शिकविण्याचे काम केले.
त्यानंतर श्री छञपती संभाजी मा व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी ला 25वर्षे झाले व मुख्याध्यापक संजय पैठणकर यांना मुख्याध्यापक पदावर व सदरील विद्यालयात 25 वर्षे पूर्ण केल्या बद्दल त्यांचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सत्कार करून अभिनंदन केले. तर मुख्याध्यापक श्री संजय पैठणकर यांनी ही सर्व सहकारी शिक्षकांचा ही यथोचित सन्मान केला.
यावेळी मुख्याध्यापक श्री संजय पैठणकर यांनी आपले शिक्षक व विद्यार्थी याबाबतीत विचार व मार्गदर्शन करताना म्हटले की,__माझ्या विद्यार्थ्यांना व माझ्या शिक्षकाना__आपल्या भारतात ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. शिक्षकांप्रती असलेले प्रेम पाहून त्यांचा हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ठरवले. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. यादिवशी सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या पाया पडतात. आदरपूर्वक नमस्कार करतात. काही विद्यार्थी गुलाबाचे फुल देऊन तर काही विद्यार्थी एखादी भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे. शिक्षक हे आपले सर्वात मोठे आणि महत्वाचे गुरु आहेत. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे. सर्वच शिक्षक हे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे महत्वाचे कार्य करतात. सर्वच शिष्यांनी आपल्या गुरूंविषयी आदरपूर्वक सन्मान, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक हे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांमुळे आपण जीवनामध्ये बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकतो. भविष्यातले शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, लेखक आणि काही विचारवंत तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. आणि या सर्व शिक्षकांमुळेच मुले विचार करतात, चांगले शिक्षण घेतात आणि मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतात. आपण जेव्हा पहिल्यांदा बालवाडीमध्ये शाळेत जातो तेव्हा आपल्याला या जगाची काहीच माहिती नसते त्यावेळी हे शिक्षक आपल्याला बऱ्याच काही नवनवीन गोष्टी शिकवतात सर्व वस्तूंची माहिती देतात. तसेच आपण आपल्या आई वडिलांपासून पहिल्यांदा दूर राहतो तेव्हा आपली संपूर्ण जबाबदारी शिक्षक घेतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मते घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. आपल्याला चित्रांवरून वेगवेगळ्या वस्तूंची माहिती करून देतात, जगभराच्या ज्ञान देतात. प्रार्थना म्हणायला शिकवतात आपल्यावर चांगले संस्कार करतात. अशाप्रकारे आपले हे शिक्षक आपल्याला घडवत असतात. या शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, गुरु शिष्यांमधील हे नाते कायम ठेवण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो.तेव्हा व्यसनापासून दूर रहावे,स्वतः ला ओळखा व जिवणात प्रगती करा असे आवाहन केले. यावेळी विद्यालयाचे सहशिक्षक डी बी ठाकरे,के व्ही फुके,पी एम पाटील,व्ही बी कल्याणकर,राजेंद्र डेढवाल,सौ उषाताई खैरे मॅडम,सौ कमलताई सोनवणे मॅडम यांनी शिक्षक दिनानिमित्त मार्गदर्शन केले .यावेळी विद्यार्थी ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें