गणेश महासंघाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 14 सितंबर 2018

गणेश महासंघाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.



सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.14, गणेशोत्सवानिमित्त सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघाच्या वतीने सिल्लोड शहरात विविध भागात सामाजिक , सांस्कृतिक व समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमा चे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
 
      समाजात सामाजिक सलोखा वाढवा , लोकप्रबोधन व्हावे , स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच महाराष्ट्रातील विविध लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमाला चालना मिळावी यासाठी आमदार अब्दुल सत्तार, जि. प.माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका गणेश महासंघाच्या वतीने सिल्लोड येथे गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो.
  सालाबादप्रमाणे याही वर्षी सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघाच्या वतीने शहरातील विविध भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. यात दि. 16 सप्टेंबर ( रविवार ) रोजी शहरातील श्री.म्हसोबा महाराज मंदिर जवळ  किशोर पाटील प्रस्तुत 'स्वर मिलाप' ऑर्केस्ट्रा , दि .17 सप्टेंबर ( सोमवार ) रोजी जय भवानी नगर भागात प्रबोधनकार भारुडरत्न निरंजन भाकरे यांचा भारुडाचा कार्यक्रम , दि 18 ( मंगळवार ) रोजी टिळक नगर भागात कलाविष्कार मुंबई प्रस्तुत  ' धमाल ' हा विनोदी कार्यक्रम , दि.19 ( बुधवार ) रोजी शहरातील शिक्षक कॉलनी भागात सामाजिक व कौटुंबिक तसेच स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेले ' नवरा माझी बायको ' या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.20 ( गुरुवार ) रोजी शास्त्री कॉलनी भागात पुणे - आळंदी येथील ह.भ.प. मुक्ताई चाळक व ह.भ.प. रुपाली हुमे यांचा ' कीर्तन जुगलबंदी ' कार्यक्रम , दि. 21 सप्टेंबर ( शुक्रवार ) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भागात लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांचा ' नार नखरेवाली ' हा लावण्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि. 22  सप्टेंबर ( शनिवार ) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथेच  महाराष्ट्रातील विविध पारंपरिक नृत्याविष्काराने गाजलेला ' महाराष्ट्राचा मराठी बाणा ' अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उत्सव काळात उत्कृष्ट ढोल पथक , उत्कृष्ट देखावा, शिस्तबद्ध मिरवणूक व सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेणाऱ्या मंडळांसाठी गुणाणूक्रमे निवड करून गणेश महासंघाच्या वतीने बक्षीस देण्यात येणार आहे.

     सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असून सिल्लोड तालुका व शहरातील रहिवासियांनी आयोजिय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर सहारे , कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर , सचिव मनोज झंवर आदींसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें