भोकरदन प्रतिनिधी *शेख सलिम* :-
स्वामी विवेकानंद विद्यालय भोकरदन येथे महिला व युवती सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. स्वामी विवेकानंद विद्यालय व भारतीय जैन संघटना भोकरदन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून रत्नाकर महाजन (प्रवक्ते) हे होते. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ.आशिष पाटील,डॉ.सिमा पाटील, मुख्याध्यापक व्ही.पी.सोनवणे, भारतीय जैन संघटना भोकरदन तालुका अध्यक्ष मयूर बाकलीवाल तर पालकांमध्ये संजय शास्त्री,गणेश सहाणे,शेख अफसर,अमजत पठाण,नारायण पाबळे, विलास परदेशी,छाया शेळके,शितल देशमुख,सुरेखा शेळके,आशा जाधव,मीरा कचरे यांची उपस्तिती होती. देशाची सुरक्षा करण्याची मोठी जबाबदारी आज बी.एस.एफ. द्वारे महिलांनी स्विकारली आहे. प्रगत व विज्ञानप्रिय समाज निर्मितीसाठी पुरुषांसह महिलांनी योगदान दिले आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष असा भेदभाव करता येऊ शकत नाही. धकाधकीच्या या जीवनात स्त्रियांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. म्हणून शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधताना स्त्रियांनी शारीरिक सुदृढतेवर भर द्यावा असे आवाहन रत्नाकर महाजन यांनी केले. मेळाव्याला विद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात महिलांचे योगदान तुल्यबळाचे आहे. मात्र आजही महिलांवरील अत्याचाराला पूर्णविराम मिळाला नाही, अशी खंत डॉ.सिमा पाटील यांनी व्यक्त केली. समाजातील स्त्रियांचे योगदान, समस्या व उपाययोजना या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारीका खाडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या गायकवाड यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें