वाळु माफियांचा जिल्ह्यातील पोलिसांवर तुफान हल्ला, चार जखमी ,एक अधिकारीही रुग्णालयात . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 15 सितंबर 2018

वाळु माफियांचा जिल्ह्यातील पोलिसांवर तुफान हल्ला, चार जखमी ,एक अधिकारीही रुग्णालयात .


जिंतूर:
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी गुन्हेगाराविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केलेली असतानाच आज जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे गावानजीक पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांवर तुफान हल्ला झाला आहे.....
माफियांनी जिंतूर तालुक्यातील पोलिसांवर तुफान हल्ला करून त्यांना जबर जखमी केल्यामुळे हे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात पाठवले असल्याची माहितीही एका पोलीस अधिकार्‍याने दिली आहे दरम्यान फरारी आरोपींची धरपकड करण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त जिंतूर तालुक्यातील गावात रवाना करण्यात आले.....

अवैध वाळूमाफियांनी आज जिंतूर तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तुफान हल्ला करण्याची घटना घडली आहे.... जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे या गावानजीक आज सकाळी ही घटना घडल्याचे समजले आहे

दिवसाढवळ्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर माफिया हल्लाल करीत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न वरून राहतो आहे......
जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे संपर्क नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या परभणी जिल्ह्याच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यात झालेली घटना निश्चितच वेदना देणारी ठरते.........
पोलिसांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करून माफिया त्यांच्यावर हल्ले करीत असतील तर त्यांना प्रतिबंध घालण्याची आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची अपेक्षा करणे चुकीचे होणार नाही.......
सुदैवाने परभणी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय गुन्हेगारावर कठोर भूमिका घेत असताना जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर मारहाणीचे प्रकार घडत असतील तर ते निश्चितच धोकादायक ठरू शकतील .......

यामध्ये ज्या कोणी गुन्हेगारांची हात आहेत त्या गुन्हेगारांना दयामाया दाखवता कामा नये ....त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे ....
अशा माफियांवर कारवाई झाली तर यापुढे पोलिसांवर हल्ले होणार नाहीत....
सणासुदीच्या कार्यकाळात आपल्या घरदार सोडून पोलिस जवान कर्तव्य करीत असताना त्यांच्यावर हल्ले होत असतील तर ते निश्चितच धोकादायक म्हणता येतील......
आम्ही अपेक्षा करतो की ,या माफियाविरुद्ध आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणाविरुद्ध ही कठोरातली कठोर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे.....
अतिशय गंभीर अशी ही घटना म्हणावी लागेल अधिकाऱ्यांवर दिवसाढवळ्या जिंतूर तालुक्यात हल्ले केले गेले त्यांचा पाठलाग करून मारहाण करण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला..
हा गंभीर प्रकार घडला असून या गावात जादा पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला असून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून आणखी आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले आहे......
जखमी पोलिसचे नावे मनोज राठोड, श्रीराम  दंडवते, जगदीश  चोपडे, मनोहर हाक या चार पोलिस कर्मचारी यांना प्रथम  उपचार जिंतुर ग्रामीण रुग्णालयात केला पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवले  गेले़ वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें