सेलू प्रतिनिधी
सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँक म.सेलू पॅकेजे सन २०१७-१८
या वर्षांसाठी बँकेच्या सभासदांना १० % लाभांश वार्षीक सभेमध्ये घोषीत केला होता.
त्याप्रमाणे सभासदांच्या खात्यामध्ये हा लाभांश जमा केला आहे अशी माहीती बँकेचे
अध्यक्ष मा.श्री.हेमंतराव आडळकर यांनी दिली.
बँकेची स्थापणा सन १९९६ मध्ये झाली असून सद्यस्थितीत बँकेच्या ठेवी
७३ कोटी असून कर्जवाटप ४८ कोटी आहे तर नफा ३८.४४ लक्ष आहे.बँकेला गेली
१० वर्षे सतत अ वर्ण प्रदान आहेबँकेचा एल.पी.ए. २.८८% आहे.
बँकेच्या दोन शाखा वर्षभरात उघडण्यासाठी रिजर्ह बँकेकडे परवानगी मागीतली
आहे.ज्या सभासदांचे बचत खाते नाही त्यांनी बँकेत ओळखपत्र दाखवून लाभार्थ्यांनी घेउन
जावा असे आवाहन साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यानी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें