सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२५सप्टेंबर २०१८
तालुक्यातील मौ.विटा (खू.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय समितीची निवड करण्यासाठी दि.२४सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत शासन निर्णयानुसार ५०% महिला, दुर्बल घटक व सर्व संवर्ग यांना विद्यार्थ्यांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन अरुण तुपसमिन्द्रे, तस्लीम पठान, अशोकराव भोरे, हुसेन चाँद सय्यद, स्वाती तुपसमिन्द्रे, सरस्वती भोसले, परवीन शेख, पौर्णिमा तुपसमिन्द्रे, भगवान दळवे, अशोक हराळ, सतीश तुपसमिन्द्रे, उषा परसे, अश्विनी भोसले, मीरा कदम यांची बहुमताने सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून शरद भोसले (ग्रा.प.सदस्य), इंदूबाई भोसले (बालविकास तज्ञा), प्रशांत होसनाळे (शि.प्र.), शेख रहीम दाऊद (सचिव), राधा काळे (विद्यार्थिनी प्रतिनिधी), ऋतिक मस्के (विद्यार्थी प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे मावळते अध्यक्ष अरुण तुपसमिन्द्रे यांची सर्वानुमते पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी तस्लीम पठान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे माजी पं.स. उपसभापती मदनराव भोसले, मुख्याध्यपक शेख आर.डी, सहशिक्षक होसनाळे, बनाळे आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें