सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१४सप्टेंबर २०१८
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या इतिहास व समाजशास्त्र विभागाच्यावतीने १२सप्टेंबर रोजी पाथरी तालुक्यातील ऐतिहासिक मुदगल येथे संयुक्त अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजशास्त्र व इतिहास विभागातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या भेटीत मुदगलेश्वर मंदिर, गोदावरी नदीवरील बंधारा आदी ठिकाणांचा अभ्यास केला, मासेमारी करणाऱ्या भोई समाज व मंदिराचे सामाजिक महत्त्व अभ्यासण्यात आले. इतिहास विभागातील प्रा.डॉ.मोहन मिसाळ व प्रा. डॉ.शिवाजी अंभुरे यांनी मंदिराच्या स्थापत्यकलेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले; तर समाजशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.सुनीता टेंगसे, प्रा. जोंधळे यांनी येथे होणाऱ्या नागबळी या धार्मिक विधी विषयी संशोधनात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी मुदगल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या अभ्यास सहलीच्या आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष परमेश्ववर कदम प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते ग्रंथपाल डॉ.आनंद सरकाळे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें