सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१४सप्टेंबर २०१८
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सोनपेठ रोटरी क्लब यांच्याच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवाडा निमित्त आपत्ती व्यवस्थापन स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य व रस्ता सुरक्षा या विषयावर सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन दि.१४सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते. सदर परीक्षा कनिष्ठ व वरिष्ठ गटात घेण्यात आली. या परीक्षेमध्ये ५० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी होता. या स्पर्धेस श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ व कै.बाजीराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय शेळगांव या महाविद्यालयातील वरिष्ठ गटातून २२१ तर कनिष्ठ गटातून २६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदरील विषयाची जनजागृती व्हावी व तरूणांचा राष्ट्रीय कार्यास हातभार लागावा हा स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असल्याचे संयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस माहिती देताना सांगितले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, रो.बाल मुकुंद सारडा, रो.नागनाथ सातभाई, रो.संजय आडे, रो. सचिन कागदे, रो.प्रा.विठ्ठल जायभाये, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.बाबुराव आंधळे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.मारोती कच्छवे यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या सामान्य ज्ञान परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यांना रोटरी क्लब सोनपेठच्यावतीने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें