जालना नगर परिषद कार्यालय वर उर्दू भाषेचे नामफलक लावण्यात यावे-एम आई एम पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 सितंबर 2018

जालना नगर परिषद कार्यालय वर उर्दू भाषेचे नामफलक लावण्यात यावे-एम आई एम पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.



जालना प्रतिनिधी:

जालना शहराची निम्मयापेक्षा जास्त लोकसंख्या ही मुस्लिम बहुल असून यामुळे जालना नगर परिषदेवर नामफलक केवळ मराठीत नाव लिहलेले आहे.याकरिता मराठी नावासहित कार्यालयावर उर्दू भाषिक फलक सुद्धा लावला पाहीजे या आशयाचे निवेदन एम आई एम पक्षातर्फे जालना निवासी जिल्हाधिकारी श्री जोशी यांना देण्यात आले.
 नगर परिषद हद्दितील मुस्लिम समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येपेक्षा निम्मयाहून अधिक आहे.तसेच नगर परिषद हद्दित मोठ्या प्रमाणात उर्दू भाषिक शाळा आहे .मुस्लिम समाजातील मुले,मूली अधिकतर उर्दू माध्यमातून शिक्षण घेतात तसेच शहरा मध्येअरबी भाषिक धार्मिक मदरसे आहेत त्या मदरस्यात उर्दू भाषा शिकविली जाते. मुस्लिम समाजाची मातृभाषा सुध्दा उर्दू असून उर्दू ही देशाची सर्वात जुनी भाषा असुन उर्दू भाषेचा वापर करणे ही काळाची गरज आहे उर्दू भाषेला सुद्धा मराठी भाषे एवढे महत्व दिले जावे यामुळे औरंगाबाद मनपा तसेच नांदेड.बीड.परभणी. (भोकरदन तालुका) .अशा अनेक जिल्ह्याच्या नगर पालिकेच्या कार्यलय वर उर्दू भाषेचा नामफलकचा वापर करण्यात आलेला आहे तरी प्रशासनाने मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेता जालना नगर परिषद कार्यालय वरील मराठी नामफलकासह उर्दू भाषेचे फलक लावावे अशीच धारणा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाची सुद्धा आहे .यामुळे पक्षाचा वतीने नगर परिषद कार्यालय वर उर्दू भाषाचे नामफलक लावण्यात यावे असे निवेदन जालना शहर अध्यक्ष ख्वाजा एहतेशामोदीन बुखारी यांचा सह सर्व ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें