काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नगराध्यक्ष अब्दुल समीर प्रचंड मताधिक्याने विजयी ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 सितंबर 2018

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नगराध्यक्ष अब्दुल समीर प्रचंड मताधिक्याने विजयी ;


युवकांच्या संघटनशक्तीतून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळवून देणार -- अब्दुल समीर ;

सिल्लोड विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी धैर्यशील तायडे ;


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.१३ ) -- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीत एकूण झालेल्या मतदनातून ८३ टक्के मतदान घेऊन औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नगराध्यक्ष अब्दुल समीर प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. तर सिल्लोड विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी धैर्यशील तायडे तर उपाध्यक्षपदी धरमसिंग चव्हाण प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहे.

युवकांच्या संघटनशक्तीतून काँग्रेस पक्षाला जिल्हाभरातून बळकटी मिळवून देऊन नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे मत नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित युवक काँग्रेस जिल्हाअध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपले मत व्यक्त केले.
औरंगाबाद येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात मतमोजणी संपन्न झाली.
औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदासाठीची मतमोजणी सर्वात शेवटी झाली. युवक काँग्रेस जिल्हाअध्यक्ष पदासाठी एकूण पाच जण निवडणूक रिंगणात होते. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी एकूण झालेल्या मतदानातून ८३ टक्के (३२९९ ) मतदान घेऊन प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे .
मतदान शांततेत पार पडले.
औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रचंड मताधिक्याने निवड जाहीर होताच काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांनी ढोल- ताशे फटाक्यांच्या आतिशबाजीत औरंगाबाद येथील काँग्रेस पक्ष गांधीभवन कार्यालयासमोर आनंदोत्सव साजरा करीत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचे स्वागत केले .
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, रऊफ बागवान, विठ्ठलराव सपकाळ, मतीन देशमुख, अमित आरके, मिर्झा सांडूबेग, हनिफ मुलतानी, अकिल देशमुख, शेख बाबर, संजय मुरकुटे, भगवान नाईक, मोहम्मद हनिफ, अकिल वसईकर, अब्दुल बासित, राधेश्याम अग्रवाल, अमित कळम, रिजवान मुलतानी, सुभाष जाधव, राजेश्वर आरके, जमीर मुलतानी, रवि आरके, जगन्नाथ कुदळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चौकट - सिल्लोड येथे फटाक्यांसह ढोल - ताशांच्या गजरात काँग्रेस कमिटीच्या वतीने जंगी स्वागत.....
सिल्लोड येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने नगराध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाअध्यक्ष अब्दुल समीर यांचे फटाक्यांसह ढोल - ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधी भवन कार्यालयात सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,शांतीलाल अग्रवाल,नंदकिशोर सहारे,निजाम पठाण, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,ताई निकम, सतीश ताठे,माणसिंग राजपूत,सलिम हुसैन,लक्ष्मण कल्याणकर, नगरसेक रईस पठाण,शेख बाबर,सुनील दूधे,राजू गौर,गुलाबराव मिरगे,अक्षय मगर,शेख वसिम, कुणाल सहारे,मधुकरराव बेंडाळे, अमोल कुदळ,सखाराम अहिरे,रावसाहेब सिरसाठ, राजु सुरडकर,तौसिफ पठाण, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें