अश्वीनी परदेशी आदर्श शिक्षीका पुरस्काराने सन्मानित . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 14 सितंबर 2018

अश्वीनी परदेशी आदर्श शिक्षीका पुरस्काराने सन्मानित .



शिर्डी (प्रतिनीधी) राजेंद्र दुनबळे.

राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील सोमैया विद्या मंदिर लक्ष्मीवाडी शाळेतील उपक्रमशिल आणि कृतिशील शिक्षीका अश्वीनी प्रदिप परदेशी यांना सोमैया विद्या विहार मुंबई संस्थेचा चा स्वर्गीय साकरबेन सोमय्या आदर्श शिक्षीका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संस्थेचे प्रमुख समीर सोमय्या,सेक्रेटरी रंगनाथन साहेब,सिंग साहेब,तसेच वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.सोमैया विद्या मंदिर लक्ष्मीवाडीच्या शाळेत परदेशी यांनी मुलांसाठी विविध उपक्रमे राबवुन शिक्षणाची गोडी निर्माण करणे,शालेय उपक्रमांतुन विद्यार्थ्यांच्या बौध्दीक पातळीत वाढ करणार्या शिक्षकी पध्दती वापरुन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या बद्दल.सोमैया विद्या विहार संस्थेच्या 60 व्या स्थापना दिना निमीत्त मुंबई येथे विशेष गौरव सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.या त्यांच्या गौरावा निमीत्त संस्थेचे मुख्याध्यापक मारुती धायतडक,पर्यवेक्षीका सौ.क्षीरसागर,सावळीविहीर च्या महिला सरपंच रुपाली आगलावे,उपसरपंच वृषाली जपे,जिजाबाई क्षेत्रे अनिता भोसले ,रिटा मैराल, सारिका मानकर, शीतल सांगळे,दीपिका राक्षे,सर्व शिक्षक-शिक्षीका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
फोटो ओळ-सोमैया च्या अश्वीनी परदेशी आदर्श शिक्षीका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रमुख समीर सोमय्या,सेक्रेटरी रंगनाथन साहेब,तसेच वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर उपस्थीत होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें