शिर्डी प्रतिनिधी,(राजेंद्र दुनबळे)
महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारच्या सणा मधील महत्व पूर्ण सण. शेतकरी बांधवांचा खरा मित्र बैल आहे,सावलीविहिर गावात मोठ्या आंनदात हा सण साजरा करण्यात आला अनेक सजवलेले बेल जोडी वाजत गाजत गावात येत होते , आज या राजाला 1 दिवाचा पूर्ण आराम मिळतो त्याची सुंदर नटलेल्या स्थितीत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावातील मारुती देवळा समोर मिरवणूक आल्या नंतर बैलराजा ला सलाम दिला गेला म्हणजे दर्शन दिले जाते. जागो जागी या राजालाची मिरवणूक झाली की घरात यायच्या आगोदर ,त्याला पुरण पोळी चा नैवेद्य दाखवला जातो , व पुराण पोळी च भोजन दिल जात. या बैल राजाची जेव्हा प्रचंड मिरवणूक निघाली तेव्हा सर्व गाव जमा झाले होते राहाता कृषी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे ,यांनी या सणाच्या सर्व जनतेस शुभेच्या दिल्या व शेतकरी राजा व जनतेस सुखी ठेवण्याची भगवंता पुढे प्रार्थना केली ,सर्व धर्मीय व जातीय चा हा सण आहे, राष्ट्रीय एकात्मचे दर्शन घडवणारा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आजचा "बैल पोळा" या बैल पोला मोठ्या उस्तवात साजरा झाला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें