प्राध्यापकांचा सामूहिक रजा आंदोलनात सहभाग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 10 सितंबर 2018

प्राध्यापकांचा सामूहिक रजा आंदोलनात सहभाग.



सोनपेठ (राजेश खेडकर)  दि.१०सप्टेंबर २०१८.

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसंदर्भात येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाातील प्राध्यापकांनी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या सामूहिक रजा आंदोलनात उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवत आपल्या रजा प्राचार्यांकडे सादर केल्या.
शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसंदर्भात प्राध्यापकांनी सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. रिकाम्या जागा पुर्णवेळ भराव्यात, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग व शिक्षणात सुधारणा करणाऱ्या इतर मागण्यासाठी एक दिवसीय सामुहीक रजा आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाविद्यालयातील प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, प्रा.डॉ.शिवाजी वडचकर, प्रा.विठ्ठल मुलगीर, प्रा.डॉ.संतोष रणखांब, प्रा.नागनाथ दहिफळे, प्रा.डॉ.कल्याण गोलेकर, प्रा.डॉ. अशोकराव जाधव, प्रा.श्रीकांत गव्हाणे, प्रा.गोविंद वाकणकर, प्रा.डॉ.सुनिता टेंगसे, प्रा.आगंद फाजगे, प्रा.विठ्ठल जायभाये, प्रा.दिलीप कोरडे, प्रा.पंडित राठोड, प्रा.डॉ.शिवाजी अंभुरे, प्रा.डॉ.बालासाहेब काळे, प्रा.डॉ.बापुराव आंधळे, प्रा.डॉ.मारोती कच्छवे, प्रा.सखाराम कदम, प्रा.डॉ.साहेबराव सोनसळे, प्रा.डॉ.वनिता कुलकर्णी, प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी, प्रा.डॉ.आंबादास बर्वे, प्रा.डॉ.अनंत सरकाळे, प्रा.संदिपकुमार देवराये, प्रा.विकास रागोले आदींचा सहभाग आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें