सेलू प्रतिनिधी.
तालुक्यातील स्वयंपाकासाठी जाणाऱ्या महिलेचा ऑटो मधून हात निसटल्याने पडून मृत्यू घटना 10 सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की सेलू ते देवगाव फाटा रोड वर कॅनल जवळ डिग्रस बरसाले शिवारात ही घटना घडली आहे ही महिला सेलू येथून स्वयंपाकासाठी साळेगाव येथे जात असताना ही घटना घडली ऑटोतून प्रवास करत असताना हात सुटून ऑटो चा बाहेर तोल जाऊन रोडवर पडल्याने डोक्याला जबर दुखापत झाली त्यामुळे निर्मलाबाई बन्सी शिंदे वय 55 वर्षे राहणार विद्यानगर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यासंदर्भात सेलू पोलिस ठाण्यात देविदास अंबादास शिंदे वय 26 राहणार गायत्री नगर सेलू यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकस्मात मृत्यू नंबर 55/18 या घटनेचा पुढील तपास बीट जमादार सुदाम शेलारहे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें