पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जाय भाये यांच्या पथकाने केली कारवाई.
सलिम शेख
भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील वालसावंगी येथे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जाय भाये यांच्या पथकाने वालसावंगी येथील जुगार अड्डयावर धाड टाकून ९ जुगरींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोटरसायकलिसह दोन लाख १४ हजार ९४० रुपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नऊ जुगारींना ताब्यात घेण्यात आले त्यात सागर गोविंद दांडगे (रा.पदमावती),अशोक किसन खरात(वालसावंगी),डिगांबर पुंडलिक फुसे(वालसावंगी),उत्तम तुकाराम उंबरकर,अझहर खा अकबर खा पठाण,विनोद दामू कोथलकर,अशोक जयवंत खरात,नामदेव गोपाळ पगारे, कल्याण भानुदास तराळ वालसावंगी यांच्या वर कारवाई करून मोटरसायकलिसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जाय भाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुदाम भागवत, सहय्यक फौजदार शेख आसेफ,पो.ना. रामेश्वर सिनकर,पोलीस कर्मचारी गणेश पायघन,विजय जाधव, सागर देवकर, शेख वाजेद ,समाधान जगताप,चालक लक्ष्मण वाघ व नारायण माळी, सुरेश डुकरे यांनी पार पाडली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें