शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करतो - डाँ.रोडगे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 सितंबर 2018

शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करतो - डाँ.रोडगे.



शिक्षक दिन व डाँ.सविता रोडगे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.


सेलू प्रतिनिधी

सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान मध्ये डाँ.सर्वपल्ली राधाक्रुष्ण्न यांच्या जयंती निमीत्य शिक्षक दिन व डाँ.सविता रोडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन  (ता.5) सप्टेंबर वार बुधवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे , संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डाँ. अपुर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे,  तसेच सर्व घटक संस्थेचे प्राचार्य आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात डाँ.सर्वपल्ली राधाक्रुष्ण्न यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
डाँ.सर्वपल्ली राधाक्रुष्ण्न हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षकतद्न्य होते. जी व्यक्ती आजन्म आपल्या लक्षात राहते. व आपण ती विद्या आछवुन त्याचे रुणी राहतो. वैदिक संस्क्रुतीने शिक्षकाला अत्युच्य स्थान दिले आहे. गुरुला देवाच्या स्थाणी मानले गेले आहे. अपेक्षा न करता आपल्या जवळचे द्यान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची गुरु कडुन असते. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आई, वडील, शिक्षक करीत असतात. आज विद्यार्थ्यांच्या मनाची पाटी कोरी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. शिक्षक हे केवळपुस्तकी द्यान शिकवीत नाहीत तर जगण्याची कला विद्यार्थ्यांना आत्मासात करुन दिली पाहीजे. शिक्षकाकडुन विद्यार्थ्यांवर त्याच्या व्यक्तीमत्वावर संस्कार, संस्क्रुती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलु पाडले जातात.त्यामुळे शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करुन त्यातुन भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात म्हणुनच शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे असे म्हटल्या जाते. शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे  तेथेच विकास आहे. त्याकारणाने अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त शाळेची स्थापणा श्रीराम प्रतिष्ठानने तुमच्या मदतीने केली आहे. असे डाँ.रोडगे यांनी आपल्या मनोगतात म्हटले.
3 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सचिव डाँ.सविता रोडगे यांच्या वाढदिवसानिमीत्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, व सर्व घटक संस्थेचे प्राचार्य यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डा.मधुबाला बोराडे यांनी केले. सुत्रसंचलन संजय ठाकर तर आभार वर्षा स्वरुप यांनी मानले.

Tezznews24 web channel.

Contact us.chief editor=8888375846.sub editor=9970670444.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें