चारठाणा( प्रभाकर कुर्हे ) जिंतुर तालुक्यातील मोहाडी येथील माजी सरपंच तथा संजय गांधी निराधार योजनेचे माजी सदस्य डाॅ.सुभाष देवकते वर्षे ४८ यांचे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
डाॅ.सुभाष देवकते यांच्या जान्याने मोहाडी या गावावर शोककळा पसरली आहे. डाॅ.देवकते हे मुरबी राजकारणी म्हणून परिचीत होते तसेच मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या पश्र्चात आई,पत्नी, एक मुलगा व तीन मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे.डाॅ.देवकते यांच्यावर सायंकाळी सातच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी विधान परिषद सदस्य आमदार रामराव वडकुते, वैधानिक विकास महा मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड.प्रताप बांगर,भाजप नेत्या मेघना साकोरे बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर,प्रा.डाॅ.शिवाजी दळणर,माजी जि.प.उपाध्यक्ष वसंत शिंदे,मा.जि.प.सदस्य राजेंद्र थिटे पाटील, नगरसेवक गोपाळ रोकडे, माजी नगराध्यक्ष डाॅ.पंडीत दराडे, अॅड.सुनिल मते,अॅड.सारडा, अॅड.गोपाळ देशपांडे,विठ्ठलराव भगस,सरपंच बि.जी.चव्हाण,इंद्रजित घाटुळ, रेवनअप्पा तमशेटे,रमेश राऊत, दिपक भाग्यवंत,सुभाष पवार,प्रदिप धुमाळ, यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते,परिसरातील हजारो नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें