" वर्षां " साठी " काय पण ....? " बळीराजाचं कंबारडंच मोडलं " - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 8 सितंबर 2018

" वर्षां " साठी " काय पण ....? " बळीराजाचं कंबारडंच मोडलं "


सिल्लोड (प्रतिनिधी)दि.08/09/2018.
धगधगत्या "ऊन्हात " शेती मशागतीची चाललेली धांदल अन् पेपर बाजीत पावसाची " शंभरी" बळीराजाच्या मनाला जणूकाही चटकाच लावून नेणारी ठरली आहे.
यंदा शंभर टक्के पाऊस होणार असल्याचे अनुमान हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजाच्या मनात थोडसं कुजबुजल्यासारखं झालं असावं , पण मनानं ठरवलं,यंदा शेती मशागतीची काटकसर करायची न्हाय,सततच्या दुष्काळाची साडेतीन - चार वर्षं गेले म्हणून काय झाले,यंदा तर कंबर कसवायचीच ...? अन् मग काय तर पावसाने वेळीच हजेरी लावून बळीराजाचं जणूकाही "चांगभलंच "करण्याचं ठरवलं पण पावसाने हजेरी लावली ती फक्त पेरणीच्या सुरुवातीपुरतीच्.....अन् पुन्हा उघडीप देऊन बळीराजाचं यंदाही पुरतं कंबारडंच मोडून टाकलं आहे.

" वर्षां "साठी (सरकार टिकवून ठेवण्यासाठी) काय पण या धांदलीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून कोटी शतकोटीची उड्डाणे उडवित इतर विकास कामांचाही राजकीय फायदा उचलण्याच्या दुरदृष्टी चक्रातून पाऊल उचलले जात असतांनाच केंद्र सरकारनेही चौदा पिकांना आधार भूत किंमतींचा वाढीव वलामा दिल्याने पुन्हा
" बळीराजासाठी काय पण " अशीच काहीशी पाऊले सरकारची रेटून पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले असले तरी कर्जबाजारीपणाच्या खाईतून होरपळून निघत असलेला बळीराजा संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

सरकारकडून शेतक-यांसाठी आश्वासनांची खैरातच वाटल्या जात आहे. कर्जमाफीचं भीजत घोंगडंही शेतक-यांसाठी डोकेदुखीच बनलेले आहे. राजकीय मंडळीही आपापल्या भल्यासाठी एकमेकांना धारेवर धरीत शेतक-यांना मध्यंतरीच लटकवून टिकाटिप्पनी करीत असतांना दिसत आहे. राजकीय फायदा मिळविण्यासाठीच सत्ताधारी - विरोधकांनी आपापल्या परीने एकमेकांवर कुरघोडी करीत राजकीय पायंडा रचण्यास सुरुवात केली आहे.
" हवामान खात्याने एकंदरीतच शंभर टक्के पावसाचा " वर्षाव " होईल असा अंदाज वर्तवल्याने बळीराजा पुन्हा कर्जाचं ओझं पेलवत शेतीच्या कामांत गुंतला पण पुन्हा पावसाने एकदाची हुलकावणी देऊन कर्जाचं ओझंही पेलवू न शकणा-या बळीराजाचं कंबारडच मोडून टाकलं आहे.
तर दुसरीकडे " बळीराजा सुखी तर देश सुखी " असी ब्रीदवाक्ये बोलणा-यांकडूनच दुसरीकडे पुढील वर्षी पार पडणा-या निवडणुकांच्या तयारीसाठी आतापासूनच " वर्षा " साठी काय पण चे पडघम वाजवण्यास सुरुवात करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें