सेलू प्रतिनिधी.
महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी याना सेलू जिंतुर तालुके दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात यावे व हेक्टरी50000रु नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले व जळलेली पिके उपजिल्हाधिकारी यांना ती पिके दाखवून त्यांच्या दालनात टाकण्यात आली ,
सविस्तर माहिती असेंकी परभणी जिल्हात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊसा मुळे यंदाच्या खरीप हातातून निगुन गेला आहे बहुतेक ठिकाणी पिके जळलेली आहेत काही ठिकाणी पिके उगवलीच नाही त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात आलेला आहे सेलू जिंतूर तालुक्यातील थोडेफार शेतकऱ्याचे सोयाबीन मूग व इतर पिकें जी तग धरून आहे तरी त्याचा उतारा मात्र अल्प प्रमाणात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सदरची पिकें काढणीचा खर्च देखिल परवडेनासा झाला आहे तसेच पिण्याच्या पशुधनाचा व चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होत आहे .व त्यातच अजून भर म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला शासनाचे खरेदी केंद्र बंद असल्यामुळे व कुठलाही व्यापारी शेत माल शासनाच्या जाचक अटीमुळे शेतमाल खरेदी करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून आहे.
यासर्व कारणास्तव सणासुदीच्या तोंडावर दसरा व दिवाळी या सनावर आर्थिक संकटाचे सावट आहे.
यामुळे सेलू व जिंतूर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावे.
या प्रसंगी
परभणी जिल्हा अध्यक्ष शेख राज,गुलाबराव रोडगे ,गणेश भिसे,निजलींग अप्पा तरवडगे ,गणेश निवळकर,रामभाऊ मोगल,सुखदेव सोळुंके,अशोक शेलार,प्रभुराज तेवर,प्रसाद कोरडे,महादेव साखरे ,सय्यद जावेद,जावेद कुरेशी,दामोदर कदम,वसीम कुरेशी,विजय राठोड आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें