सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील दोन तरुण गावाकडे आपल्या दुचाकीवरून जात असताना सेलू देवगाव फाटा रस्त्यावरील डिग्रस बरसाले पार्टीच्या परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारणे दुचाकीस धडक दिल्यामुळे ही घटना शनिवार२९ सप्टेंबर रोजी रात्री ८:२०वाजेच्या सुमारास घडली अपघातात जखमी झालेल्या दोन तरुणांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू येथील एका कारखान्यावर काम करून दररोजच्याप्रमाणे गावाकडे दिग्रस बरसाले येथे जात असताना सेलू देवगाव फाटा रस्त्यावरील दिग्रस बरसाले पार्टी परिसरात देवगावफाट्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या ईनोवा गाडी क्रमांक एम एच ४४जी १५५१ या गाडीने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील विलास धर्माजी कसाब वय २३ रामा सुंदर्राव कसा वय १८ राहणार दिग्रस बरसाले हे दोघेजण जखमी झाले सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार नंतर परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे अपघात झालेली अंबाजोगाई येथील असल्याचे कळले असून त्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ही गाडी थांबवून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें