नाल्याचा नैसर्गिक प्रवाह रोखून भूखंडावर बांधकाम सुरूच.नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 सितंबर 2018

नाल्याचा नैसर्गिक प्रवाह रोखून भूखंडावर बांधकाम सुरूच.नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी.



सेलू प्रतिनिधी.समशेर खान.

सेलू पाथरी रस्त्यावरील बिनायके इंडस्ट्रीजच्या समोरील भागात असलेल्या पुलाची जागा अतिक्रमित करून त्यावर बांधकाम करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या निवृत्त प्राचार्य देवधर यांनी नगरपालिकेच्या डोळ्यात धूळफेक करून बांधकाम सुरूच ठेवलेले आहे सदरील नाल्याचा नैसर्गिक प्रवाह मोडून बांधकाम करत असल्यामुळे या कॉलनीतील नागरिकांना भविष्यात अडचणींना तोंड द्यावे लागेल त्यामुळे नाल्याचा प्रवाह सोडून बांधकाम थांबवण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी परभणी तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू यांच्याकडे केली आहे
येथील सेलू पाथरी रोड लगत बिनायके इंडस्ट्रीज असून  त्या समोरील भागात एक जुना नैसर्गिक नाला आहे त्यावर पूलही बांधलेला आहे पावसाळ्यात तसेच पाणी आल्यानंतर या पुलाखालून आणि जे पाणी वाहते ते पाणी यशवंत नगरात घुसते मात्र या नाल्याच्या जागेवरच रोड लगत असलेल्या भूखंडावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य देवधर यांनी बांधकाम सुरू केलेले आहे या भूखंडावर मुरूम माती टाकून भराव टाकलेला स्पष्ट दिसत आहे त्यामुळे मात्र  सदरील नाल्याचा नैसर्गिक प्रवाह थांबवला जाण्याची  भीती असून सदरील जागाही शासनाची असते त्यामुळे आहे त्या सरकारी जागेवर तर अतिक्रमण होत आहे शिवाय नाल्याचा प्रवाह रोखल्यामुळे या घरात या भागातील अन्य घरास ही  धोका निर्माण होऊ शकतो तरी नाल्याच्या जागेवर होत असलेल्या  अतिक्रमण व या जागेवरील बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे व संबंधितावर  कारवाई करावी अशी मागणी दिलीप डासाळकर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी नगरपरिषद  सेलू यांच्याकडे केली आहे.
फोटो ओळी=सेलू पाथरी रोडवरील नाल्याचा प्रवाह दिसत असून नाल्याच्या प्रवाहातच  होत असलेले बांधकाम दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें