सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१३सप्टेंबर २०१८
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची वाट बघत असलेल्या भक्तांची प्रतिक्षा अखेर समाप्त झाली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली. गणरायाचे आज दि.१३सप्टेंबर गुरूवार रोजी राज्यभरात मंगलमय वातावरणात आगमन झाले. सोनपेठ शहर व तालूक्यातही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात व ढोल ताशाच्या गजरात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांंच्या गणपतींंची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणी परंपरेप्रमाणे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेशोत्सवा दरम्यानच्या काळात तालूक्यात कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहावी, म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवलेला असून सर्व नागरीकांनी व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पो.नि.सोपान सिरसाट यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें