चि.मेहराज रहीम शेख याच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 सितंबर 2018

चि.मेहराज रहीम शेख याच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.११सप्टेंबर २०१८
शहरातील एल.आर.के.विद्यालयात तिसरी इयत्तेत शिकत असलेला विद्यार्थी चि. मेहराज रहीम शेख याचा वाढदिवस शाळेत साजरा करण्यात अाला. यावेेेळी माझा ग्रंथरूपी वाढदिवस या उपक्रमांतर्गत चि.मेहराज याचे वडील जि.प.प्रा.शाळा विटा (खू.)चे मुख्याध्यापक रहीम शेख यांनी वाढदिसाचे औचित्य साधून शालेय ग्रंथालयास राष्ट्रीय महापुरुष, क्रांतिकारक, शास्त्रज्ञ व समाजसेवकांचे इंग्रजी भाषेतील चरित्रपर पुस्तकांचा संग्रह विद्यालयाचे प्राचार्य नरहारे यांच्याकडे सुपूर्द केला.
सोनपेठ तालुका ग्रंथ वाचन चळवळीच्या प्रेरणेतून सोनपेठ तालूक्यातील अनेक शाळा, महाविद्यालयातून ग्रंथरूपी वाढदिवस साजरे करण्यात येत आहेत. लोप पावत असलेली वाचन संस्कृती या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांची पुन्हा नव्याने नावारूपाला येत आहे.
   आजच्या या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य नरहारे सर, वर्गशिक्षक रंगनाथ सर, नायकोडे सर, व  विद्यार्थ्यांंची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी चि. मेहराज यास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन करण्याचे आवाहन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें