सेलू पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 सितंबर 2018

सेलू पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न.



सेलू प्रतिनिधी.

सेलू :- आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सव, मोहरम, नवरात्र च्या अनुषंगाने सेलू पोलिस ठाण्यात सोमवारी 10 सप्टेंबर रोजी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, तहसीलदार आसाराम छडीदार, पोलीस निरीक्षक संदिपान शेळके, महावितरणच्या अंजली नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, संभाजी ब्रिगेडचे छगन शेरे, नगरसेवक रहीमखान पठाण, भाजपचे डाॅ. ऋतूराज साडेगावकर, मिलिंद सावंत, अॅड. लहरचंद खोना, जयसिंग शेळके यांनी प्रशासन व गणेश मंडळाच्या संबंधीत मनोगते व्यक्त केली. विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांनी आपआपले विचार व्यक्त केले तसेच पोलिस विभागातर्फे सूचना देण्यात येऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गणेश मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, पोलीस कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमचे सुत्रसंचालन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले तर बैठकीचे व्यवस्थापन व आभार पोलीस जमादार प्रदीप हिरक यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें