तेलंगणामध्ये बसचा भीषण अपघात, 52 प्रवाशांचा मृत्यू . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 सितंबर 2018

तेलंगणामध्ये बसचा भीषण अपघात, 52 प्रवाशांचा मृत्यू .



तेलंगणातील जगतियालमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 52 लोकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोंडागट्टू घाटात राज्य परिवहन निगमची बस उलटल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 62 प्रवासी प्रवास करत होते. त्यामधील 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिर येथून जगतियालला जात असताना हा अपघात घडला. उतरणीचा रस्ता असल्याने वळण घेताना बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें