सिल्लोड (प्रतिनिधी)दि 26
भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार असुन
भ्रष्टाचारीच्या खोटारड्या मुद्यांवर सत्ता मिळवून राफेलसारखा कोट्यावधींचा भ्रष्टाचार करीत चौकीदारच भागीदार बनले असुन दिन - दलित सामान्य जनता महागाईच्या खाईत भरडली जात असुन डिझेल - पेट्रोलच्या किंमती गगणास भिडल्याने नागरिक खुपच हालअपेष्टा सहन करीत आपले जीवन जगत असल्याचे मत माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सततच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झाला असुन फसवी कर्जमाफी जाहीर करुन शेतक-यांना वेठीस धरण्याचे काम भाजप सरकार करीत असुन श्रावण बाळ - संजय गांधी - निराधार योजनांचे गोरगरिबांना मिळणारे अर्थसहाय्यही बंद करण्याचा घाट या सरकारने रचण्याचे काम सुरु केले असुन निराधारांना वा-यावर सोडण्याचे काम करीत शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे मत आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव- अन्वी येथील एल्गार याञा सभेत हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करतांना आ.अब्दुल सत्तार बोलत होते.
माजी आ.कल्याणराव काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,नरसिंगदादा चव्हाण,राजाराम पाडळे, आदिंनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,धरमसिंग चव्हाण,अतिश पितळे, नंदकिशोर सहारे,सतीश ताठे, प्रभाकर आबा काळे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पाडळे,कासाबाई गवळे, कलाबाई अहिरे, दामुआण्णा गव्हाणे, राजाराम पाडळे, गोपीचंद राठोड,शांतीलाल बसय्यै,मोतीराम पाडळे,कृष्णा ऊखर्डे,तानाजी सनान्से,जगन पाटील, चंदू बोर्डे, विठ्ठलराव सपकाळ,सलिम हुसैन,रऊफ बागवान, राजु गौर,राजुमिया देशमुख, सुनिल दुधे, शेख बाबर बागवान,रब्बानी सेठ, मतीन देशमुख,संजय मुरकुटे, पांडुरंग गवळी, मनोहर आरके,गणेश डकले,अब्दुल बासित,राजेश्वर आरके,अमोल कुदळ,यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
एल्गार याञा - सरकारची पोलखोल करण्यासाठीच -- माजी आ. कल्याणराव काळे;सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे एल्गार याञेत हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करतांना माजी आ. कल्याणराव काळे यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराचा चांगलाच समाचार घेत एल्गार याञा भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठीच काढण्यात आली असल्याचे मत व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें