सोनपेठ (प्रतिनिधी) दि.२७सप्टेंबर २०१८
सोनपेठ तालुक्यातील मै.वाणीसंगम येथील जि.प.प्रा.शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासन निर्णयानुसार ५०% महिला, दुर्बल घटक व सर्व संवर्ग यांना विद्यार्थ्यांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन संदिपान झिरपे, मुरलीधर पायघन, नानाभाऊ पठाडे, विठ्ठलराव पायघन, धोंडीराम झिरपे, सौ.मंगल उंडाळकर, सौ.सुवर्णा वाघमारे, सौ.रूक्मीण शेळके, सौ.गिता काळे, सौ.स्नेहा गुजराथी, सौ.मनिषा पायघन यांची निवड सहमतीने मनमोकळ्या वातावरणात करून एक आदर्श घडवला. तसेच आनेबा काळे (स्था.प्रा.सदस्य), विलास वाघमारे (बालविकास तज्ज्ञ), नागनाथ जाधव (शिक्षक प्रतिनिधी), दत्ता पवार (मु.अ. सचिव), प्राप्ती शेळके (विद्यार्थिनी प्रतिनिधी), रोहित झिरपे (विद्यार्थी प्रतिनिधी)
यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यानंतर मावळत्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिपान झिरपे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली तर मुरलीधर पायघन यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व पालकांनी व गावकऱ्यांनी एका उत्कृष्ट शाळेसाठी चांगली समिती बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात निर्माण केल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी सर्व समिती गठित करण्याची प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक डी.के.पवार, सहशिक्षक नागनाथ जाधव, संतोष डांगे यांनी पार पाडली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें