थकबाकी वसुल करुन दिल्यास कमिशन देण्याचा सल्ला.
शासनाच्या नुसत्या घोषणा बेरोजगार मात्र वार्यावर.
बेरोजगार तरुणांचि निवेदनाव्दारे जिल्हाधिकार्यांकडे तक्रार.
चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) सेलु येथिल देणा बँकेत सावंगी पी.सि येथिल बेरोजगारांनी मुद्रा लोनची मागणी केलि आसता गावातील थकित पिक कर्जा मुळे बेरोजगारांना मुद्रा लोन नकारुन लोन पेक्षा गावातील वसुली करुन दिल्यास 10% रक्कम कमिशन स्वरुपात मिळन्याचा सल्ला येथिल शाखाधिककर्यानी देउन शासनाने बेरोजगारांना रोजगार मिळवुन देण्याच्या ठरवली आसतांना सर्व सामान्यांना बंँकाच्या आडमुठ्या धोरणामुळे बेरोगारांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे प्रकरणी जिल्हाधिकार्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार बेरोजगार तरुणांनी केली आहे.
या बाबत आधिक माहिती आशी कि एकिकडे केंद्र व राज्य शासन बेरोजगारी कमी करण्याच्या द्रष्टीने वेगवेगळ्या योजना राबवुन प्रयत्न करित आसतांना त्या साठी राबवल्या जाणारे विविध क्षेत्र त्याला सहकार्य न करता वेगळा मार्ग आवलंबत आसल्याने बेरोजगारांचे प्रश्न जैसे थे आसल्याचे चित्र पाहावयास मिळत आसुन सावंगी पी.सि येथिल सुशिक्षीत बेरोजगार तरुन आरुन वाव्हुळे व क्रुष्णा थटवले हे सेलु येथिल दत्तक आसलेल्या देणा बँकेच्या शाखेत मुद्रा लोन कर्ज मागण्या साठी गेले आसतांना वेळोवेळी टाळाटाळ होत आसल्याने शाखाधिकार्यांना का टाळाटाळ होत आहे बाबत जाब विचारला आसता तुमच्या गावात शेतकर्यांकडे पिक कर्जाचि खुप थकबाकी आसल्याने तुम्हाला मुद्रा लोन देता येणार नाही त्या पेक्षा तुम्ही तुमच्या गावातिल वसुलि करुन द्या आम्ही तुम्हाला 10% कमिशन देउ नंतर या कमिशनच्या पैशावर व्यवसाय उभारण्याचा सल्ला येथिल शाखाधिकार्यांनि दिल्याने या बेरोजगारांसमोर मोठे प्रश्न चिन्ह निर्मान झाले आसुन या बाबत एका निवेदनाव्दारे तक्रार जिल्हाधीकारी यांच्या कडे या तरुनांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें