सोनपेठ (राजेश खेडकर)दि.०३सप्टेंबर २०१८
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शरद जोशी शेतकरी संघर्ष यात्रेस आज दि.०३सप्टेंबर पासून तालुक्यातील मौजे वडगाव येथुन ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या ८३व्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वडगाव (ता. सोनपेठ) ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अशी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या शेतकरी संघर्ष पदयात्रेची सुरुवात वडगाव येथुन ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवुन नुकतीच करण्यात आली. या वेळी शरद जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा, बंद साखर कारखाने सुरु करुन थकित ऊस बीले द्यावीत, सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन नवे कर्ज वितरीत करावे आदी व इतर स्थानिक प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून; सोनपेठ, पाथरी, मानवत, परभणी तालुक्यातील ८३ गावांना यामाध्यमातून भेट देणार आहे.
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, मराठवाडा विभाग प्रमुख सुधीर बिंदू, कॉम्रेड विलास बाबर, जि.प. सदस्य, श्रीनिवास जोगदंड, डॉ. सुभाष कदम, पंचायत समिती सदस्य शंकर बचाटे आदींंसह शेतकरी संघटनेचे बंडू सोळंके, अनंत कदम, अच्युत रसाळ, वजीर मामा, आण्णा जोगदंड, माऊली जोगदंड, किशोर जोशी, माऊली बचाटे, माजी सरपंच अमोल बचाटे, भागवत बचाटे, रावसाहेब बचाटे, माधव जाधव, राजेभाऊ बचाटे, विश्वंभर गोरवे, मच्छींद्र जगताप यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली कदम यांनी केले तर सुत्रसंचालन मारोती सपकाळ यांनी केले. शेतकरी संघटनेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें