योजना कार्यन्वित होताच शहराच्या पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक क्रांतीला चालना मिळेल - आ.अब्दुल सत्तार.
सिल्लोड : प्रतिनिधी (दि.१८) - सिल्लोड शहरासह परिसरातील नागरिकांची खडकपुर्णा वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल त्याच बरोबर तहान भागेल व औद्योगिक क्रांतीला यातून चालनाही मिळण्यास मदत होईल त्याचा प्रत्यक्ष परिणाम मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यास नक्कीच होईल असे मत माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सिल्लोड - भोकरदन संयुक्त पाणी पुरवठा योजना नविन जलशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन मंगळवार (दि.१८) रोजी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे नगराध्यक्ष अब्दुल समीर, भाजपा गटनेते सुनिल मिरकर, सुदर्शन अग्रवाल आदिंनी उपस्थितांना पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले .
पुढे बोलतांना आ.अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहराची २०४६ पर्यंतच्या झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्या वाढीचा विचार करून विशेष बाब म्हणून खडकपुर्णा धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेण्यात आलेली आहे. या योजनेचे काम झपाट्याने पूर्णत्वाकडे नेले जात आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे शहरासभोवताली छोट्या मोठ्या उघोगधंद्याना उभारणीसाठी यातून चालना मिळणार आहे. सिल्लोड शहरालगतच्या डोंगरगाव, वरुड, पिंप्री, मोढा खुर्द व बु.आदि गावांनाही करार करून वाढीव पाणी पुरवठा योजनेतून पाणी देण्याचा विचार आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक तयारी असली तर तसा निर्णय घेतला जाऊ शकतो असे बोलत, पुढे बोलतांना ते म्हणाले खडकपुर्णा पाणी पुरवठा योजनेमुळे पिण्याचा पाण्याची समस्या तर सुटणारच त्याच बरोबर शहर व परिसरात औद्योगिक क्रांतीला चालना मिळवून देण्यासाठी मदतीची ठरणार आहे. मतदारसंघातील बेरोजगारांना या औद्योगिक क्रांतीमुळे रोजगार उपलब्ध होईल असे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे
शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार
माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलरावसपकाळ, शांतीलाल अग्रवाल, चेअरमन रमेश पाटील साळवे, राजाराम पाडळे, दामुआण्णा गव्हाणे,सतीश ताठे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, रऊफ बागवान, रईस मुजावर पठाण, सुपडू कुरैशी, राजरत्न निकम, कैसर आझाद, शेख मोहसिन, सलिल हुसैन, सत्तार हुसैन, नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे, सुनिल गोराडे, ए.एम.पठाण, कौतिकराव मोरे,मनोज झंवर, संजय मुरकुटे, अनिसखा पठाण, अशोक आप्पा गुळवे, भागाजी सागरे, महम्मद इसाक, धैर्यशील तायडे, हनिफ मुल्तानी, निजाम पठाण, चंदू बोर्डे,मुश्ताक बापु देशमुख, उदय बिरारे, अजहर पठाण, रविंद्र राजपूत, जमीर मुल्तानी, नईम देशमुख, संजय फरकाडे, मधुकरराव बेंडाळे, अमित कळम, शेख सलिम, अमित आरके, अब्दुल बासित, गणेश डकले, अक्रम देशमुख, मनोहर आरके, रावसाहेब सिरसाठ, फईम पठाण, सुभाष जाधव,रवि आरके, तौसिफ पठाण, सय्यद रहिम आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता प्रकाश बन्सोड यांनी केले. सुत्रसंचालन देवेंद्र सुर्यवंशी यांनी तर आभार कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें