सेलु शहरात ६४ तर तालुक्यात १३२ गणेश मंडळाची स्थापना.महसूल पोलीस प्रशासनामुळे एक गाव एक गणपती १८ गावात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 19 सितंबर 2018

सेलु शहरात ६४ तर तालुक्यात १३२ गणेश मंडळाची स्थापना.महसूल पोलीस प्रशासनामुळे एक गाव एक गणपती १८ गावात.


सेलू प्रतिनिधी शमशेर खान

सेलू शहरासह तालुक्यात  गणेश मंडळाची मागील वर्षापेक्षा संख्येत वाढ झाली सेलू शहरात  ६४ गणेश मंडळाची स्थापना झाली असून यापैकी ५३ गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली आहे. तर तालुक्यात १३२ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे पैकी १०० गणेश मंडळाने परवानगी घेतलेली असून ३२ गणेश मंडळांची परवानगी घेणे बाकी आहेत अशी माहिती सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीपान शेळके यांनी दिली तालुक्यात एक गाव एक गणपती १८ गावात महसूल व पोलीस प्रशासन  बरोबरच स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यां मुळे यशस्वी झाले गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याच्या कामी जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती मध्ये  आणणारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सीआरपीसी १०७अंतर्गत १३१ तसेच सिआरपीसी ११० प्रमाणे सोळा प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी एका दिवसासाठी १४४  सीआरपीसी अंतर्गत ३१ लोकांना प्रतिबंधित  कारवाई करण्यात आली तर सहा  जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविण्यात आले आहे सीआरपीसी १४९ प्रमाणे १६० गणेश मंडळांना नोटिसा पोलीस निरीक्षक यांनी दिल्या आहेत दरम्यान गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाने बंदी घातली असून कोणत्याही गणेश मंडळाने डिजे आगर  कर्णकर्कश वाद्य लावु नये तसेच अश्लील गाणे वाजवू नये कोणाच्याही भावना दुखू नयेत असे आढळून आल्यास डीजे लावल्यास गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्यावर गुन्हे दाखल करून साहित्य जप्त करण्यात येईल दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात येऊन हादगाव पावडे येथील गणेश विसर्जन ठिकाणाची पाहणी करण्यात आली  यावेळी तहसीलदार आसाराम छडीदार उपविभागीय पोलिस अधिकारी  रेणुका वागळे नगराध्यक्ष विनोद बोराडे मुख्याधिकारी देविदास जाधव बांधकाम विभागाचे अभियंता प्रल्हाद कोरे वीज वितरण चे  उप अभियंता  राजेश मेश्राम पोलीस निरीक्षक संदिपान शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक  डॉ नितीन काशीकर  नगरपालिकेचे स्वच्छता प्रमुख  सुदाम राठोड यांनी पाहणी केली शांतता सुव्यवस्थेसाठी वालूर धामणगाव हातनूर येथे बैठका घेण्यात आल्या एस आर पी एफ ची दहा जनांची तुकडी मुख्य कार्यालयाकडून ५ तर २८ पुरुष तीन महिला होमगार्ड असून पोलिसांची संख्या ६५ तर अधिकारी ३ आहेत तसेच परळी रेल्वे पोलीस ठाणे येथून एक पोलीस उपनिरीक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे
एक गाव एक गणपती ची १८ गावे याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनुर ,रायपुर, साळेगाव, वलंग वाडी ,खेर्डा,डुगरा, सोन्ना, जिवाजी जवळा, ब्राह्मणगाव, गोमेवाकडी, कुंभारी, वाकी ,वाघ पिंपरी ,नागठाणा ,खूपसा, काजळी रोहिना, डिग्रस वाडी ,सिद्धनाथ बोरगाव आदी गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें