मानवत येथे शॉक लागुन जनावराचा मृत्यु .३ म्हशी १ गायसह ५ शेळ्या दगावल्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 सितंबर 2018

मानवत येथे शॉक लागुन जनावराचा मृत्यु .३ म्हशी १ गायसह ५ शेळ्या दगावल्या.


मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.०६: मानवत येथील पाथरी परभणी हायवेवरील झरी पादन रस्त्यावर ३३ के व्ही लाईन चे  काम बी बी जी कंपनीकडुन  नवीन लाईन वढण्याचे काम चालु असुन यावेळी  जमीनीवर असलेल्या तारामध्ये अचानकपणे  विद्युत प्रवाह सुरु झाला व  नेमक याच वेळी जनावरांना चारुन  घरी  आणत  आसताना खाली पडलेल्या ताराला जनावराचा स्पर्श झाल्याने ३ म्हशी १ गाय व ५ शेळ्याला शॉक  लागुन जनावर जागेवरच दगावल्याची घटना आज दि.६ सप्टेंबर रोजी ४ वाजताच्या सुमारास घडली.
या विषयी प्राप्त  माहितीनुसार मानवत हायवेवरील प्रभाकर  रासवे यांच्या मळ्याजवळ   झरी पादन रस्तावर एकसप्रेस फिटर नंबर ३ चे काम चालु असुन हे काम सुरु असताना अचानकपणे विद्युत पुरवठा सुरु झाल्याने आणी तेथुनच यावेळी शेतातुन गुराखी आकाश दिगंबर जाधव व बालाजी नामदेव चिंचळकर हे म्हशी व शेळ्या घरी  घेऊन जात असताना जनावराना शॉक लागल्याने मृत्यु झाला प्रसंगावधान ठेवल्याने दोन्ही गुराखी चे जीव वाचले व तेथेच खांबावर लाईनचे काम करनारे बी बी जी चे कामगार वाचले आहे.यात शेळी गाय व म्हशी मिळुन अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असुन
एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांच्या माहिती प्रमाणे बी बी जी च्या कडुन कोणतीही कल्पना न देता हे काम आज सुरु होते तर बी बी जी चे कर्मचारि हे
एम एस ई बी ची चुक असल्याचा सागत आहे आता अधिक  तपासानंतर नंतर कळेल कि  यात चुक कोणाची होती बातमी लिहेपर्यत  गुन्हयांची नोद मानवत पोलीस स्टेशन येथे दाखल झाली नव्हती पोलीस पंचनामा सुरु होता .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें