ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्या विरोधात एट्रासिटीचा तर रा.का.तालुका अध्यक्ष मनोज थिटेसह सह जणाविरूध्द लुबाडणूकीची गुन्हा.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 सितंबर 2018

ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्या विरोधात एट्रासिटीचा तर रा.का.तालुका अध्यक्ष मनोज थिटेसह सह जणाविरूध्द लुबाडणूकीची गुन्हा..


जिंतूर / निशाद आहेमद

 जिंतूर परस्परांच्या विरोधातील फिर्यादीवरून व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष, स्वा.रा.ती.विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा माहेश्वरी सभेचे प्रदेश संघटन मंत्री ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्या विरोधात एट्रासिटीचा तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज थिटेसह सहा जणांविरुद्ध मारहाण करून एक लाख साठ हजार रुपायाचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी रविवारी दि.१०सप्टेंबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्या विरोधात वरुड नृसिंह येथील राहणार शरद सुदाम चव्हाण या मजूराने दिलेल्या तक्रारीत म्हटले की,रविवारी सकाळी सात चाळीसच्या सुमारास तो दुचाकी  क्रमांक एम एच 22,4757 वर बसून गावाकडे वरुड (न्रसिंह) येथे जात असताना रोडवरील शासकीय गोदामजवळ पाठीमागून आलेल्या. तोष्णीवाल यांच्या कार क्रमांक एम एच 22 यु 8281 ला बाजू दिली नसल्याच्या कारणावरून राग येऊन  त्यांनी आपणास  जातीवाचक शिवीगाळ केली.यावेळी श्रीकिशन थिटे, राजाभाऊ थिटे यांनी सोडवासोडव केली.

   तर सचिन तोष्णीवाल यांच्या तक्रारीवरून ते त्यांचे काका ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांच्यासह याच रोडवरील त्यांच्या शेतात दूध आणण्यासाठी कारने जात असताना सकाळी सव्वासातच्या सुमारास शासकीय गोदामजवळ राष्ट्रवादी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष मनोज थिटे, राजाभाऊ मानकरी, श्रीकिशन थिटे, अनिल काळदाते, संदीप राठोड व अनोळखी नावाचे शरद यांनी कार अडवून मला खाली उतरण्यास भाग पाडले. त्यावेळी मनोज थिटे यांनी माझ्या गळ्याला चाकू लावून  आम्हाला न विचारता तालुक्यात सरकारी कामे का घेता व टेंडर का भरता म्हणत अश्लील शिवीगाळ केली. यावेळी अनोळखी व्यक्तीने गळ्यातील तीन ग्राम सोन्याची चेन तोडून घेतली तर मानकरी,श्रीकिशन थिटे, काळदाते यांनी ब्रिजगोपाल तोष्णीवला यांना गाडीतून उतरण्यास मज्जाव करून मला थापडबुक्यांनी मारहाण केली. यावेळी काळदाते याने बोटातील अंगठी व खिशातील रोख वीस हजार रुपये काढून घेतले व आमच्याविरुद्ध  पोलिसात फिर्याद दिल्यास तुझ्यावर एट्रासिटीची केस करतो म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी वरुडकडून येत असलेले गंगाधर बोर्डीकर व विजय मुंडे हे सदरचा प्रकार पाहुन थांबले व विचारपूस करत असताना सर्वजण पसार झाले.

  सदर प्रकरणी आलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी रविवारी संध्याकाळी तोष्णीवाल यांच्या विरुद्ध अ.जा.ज.३(१) नुसार एट्रासिटीचा तर थिटे यांच्यासह सहाजणावर जबरी लुबाडणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर  व फौजदार सुरेश नरवाडे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें