मुलीच्या वाढदिवसानिमत्त झाडांना सरंक्षण जाळ्या भेट देऊन केले वृक्षरोपन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 सितंबर 2018

मुलीच्या वाढदिवसानिमत्त झाडांना सरंक्षण जाळ्या भेट देऊन केले वृक्षरोपन.


वृक्षलागवडी बरोबर वृक्षसंवर्धन करणेही गरजेचे आहे- सुनील जायभाये.


प्रतिनिधी-शे.सलिम.

भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील कृष्णा लोखंडे यांनी मुलीच्या वाढदिवसावर इतर खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील झाडांना 25 संरक्षण जाळ्या भेट दिल्या.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्या हस्ते वृक्षरोपन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी डी सोंळूके तर प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे,शालेय समिती अध्यक्ष हिरालाल जावळे,उपसरपंच समाधान लोखंडे,माजी सरपंच अनिल लोखंडे,ग्रा.सदस्य बालाजी लोखंडे,सहशिक्षक के टी इंगळे,एस एच टेकाळे,सचिन वाघ,गजेंद्र येवले,संजय लोखंडे प्रदिप बदर व पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पुढे बोलतांना सुनिल जायभाये म्हणाले की, वाढदिवसावर खर्च करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.त्यावर खर्च करण्याचे प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र कृष्णा लोखंडे यांनी मुलीच्या वाढदिवसावर कुठलाही अवाढव्य खर्च न करता शाळेतील झाडांना संरक्षण जाळ्या भेट दिल्यामुळे झाडे जगतील.तसेच वृक्षलागवडी बरोबर वृक्षसंवर्धन करणेही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण मुलांचा सांभाळ करतो त्याचप्रमाणे झाडांचाही सांभाळ करा असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांनी केले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की माझा हि जन्म सर्वसामान्य कुटूंबांतच झाला आणि प्रथम आपले मार्गदर्शक आई वडीलच असतात.आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत आणि सातत्य असणे गरजेचे असून चांगला अभ्यास करण्याचा सल्ला सुनिल जायभाये यांनी विध्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष भोवते यांनी तर आभार अनिल भुतेकर यांनी मानले.
शाळेत वृक्षरोपन करतांना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये,सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे ,मुख्याध्यापक पी डी सोंळूके आदी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें